जिल्हाभर वाजले भाजपाचे “डफडे!’; या मागणीसाठी पेटवलं आंदोलन!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम करण्यापूर्वीच राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घोषित झाल्याने या निर्णयाविरोधात भारतीय जनता पक्षातर्फे आज, १५ सप्टेंबरला जिल्हाभर डफडे बजाओ व निषेध आंदोलन केले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळेच आरक्षण गमवावे लागल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. सरकारने मागासवर्गीय आयोगाला निधी दिला नाही, कार्यालय दिले नाही. ओबीसींचे …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम करण्यापूर्वीच राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घोषित झाल्याने या निर्णयाविरोधात भारतीय जनता पक्षातर्फे आज, १५ सप्‍टेंबरला जिल्हाभर डफडे बजाओ व निषेध आंदोलन केले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळेच आरक्षण गमवावे लागल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. सरकारने मागासवर्गीय आयोगाला निधी दिला नाही, कार्यालय दिले नाही. ओबीसींचे आरक्षण कायम होईपर्यंत निवडणुका घ्यायच्या नाहीत असे सर्वपक्षीय धोरण ठरले असताना मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाचा विश्वासघात केल्याचा आरोप भाजपने केला आहे.

  • भाजप जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वाखाली खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर डफडे बजाओ आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे गजानन देशमुख, अनिता देशपांडे, सुरेश गव्हाड, चंद्रशेखर पुरोहित, शांताराम बोधे, राम मिश्रा, पवन गरड, जितेंद्र पुरोहित, डॉ. एकनाथ पाटील, विजय देशमुख यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
  • बुलडाणा येथील भाजप कार्यालयासमोर योगेंद्र गोडे, शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, विजयाताई राठी, विवेक गिऱ्हे, आशिष व्यवहारे, हर्षल जोशी, पंडितराव सपकाळ, नितीन बेंडवाल, नगरसेवक अरविंद होंडे, मंदार बाहेकर यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
  • लोणार येथे तहसीलदारांना निवेदन देऊन निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी लोणार भाजपा तालुकाध्यक्ष बाबाराव मुंडे, भगवानराव सानप, विजय मापारी, बाबाराव गीते, शिवाजी सानप, गणेश डोळे, किसान मोर्चाचे मारोतराव सुरोशे, लोणार शहराध्यक्ष गजानन मापारी, पंढरी सांगळे, उद्धव आटोळे, विष्णू डोळे यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
  • मलकापूर येथे माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
  • नांदुरा येथे भाजपा ओबीसी मोर्चातर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष श्याम राखोंडे, तालुकाध्यक्ष संतोष मुंढे यांनी आंदोलनाचे नेतृत्त्व केले. तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन देण्यात आले. आंदोलनात उमेश शंकरसा ताकवाले, सौ. सारिकाताई डागा, सौ.लताताई ठोंबरे, सौ.अनिताताई चौधरी, दत्ता सुपे, नितीन लहाने, राजेश डागा, जगन्नाथ डांगे, अविनाश इंगळे, संजय घाटे, गणेश भोपळे, विजू अहीर, नीलेश वेरुळकर, अमोल डहाके, सचिन राणे, जितू मोरे, रामसिंह ठाकूर, पोरस राखोंडे, सनी तेलंग, निवास घुले, शिवराज फणसे, गोविंदा वानखडे, शंभूराज डंबेलकर, अभिमन्यू राखोंडे, आकाश म्हसणे, प्रतिक मानकर, दत्ता सावरकर, प्रकाश बावस्कर आदी सहभागी झाले होते.