जऊळका सरपंच पायउतार!
सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जनतेतून निवडून आलेल्या जऊळका (ता. सिंदखेड राजा) येथील सरपंच द्वारकाबाई प्रभाकर सांगळे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव काल, चार ऑगस्टला सहा विरुद्ध दोन मतांनी पारित झाला. ३० जुलैला उपसरपंच नामदेव म्हसाजी बुधवत व इतर सदस्यांनी सरपंचांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यावर निर्णय घेण्यासाठी काल तहसीलदारांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत सरपंच …
Aug 5, 2021, 09:30 IST
सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जनतेतून निवडून आलेल्या जऊळका (ता. सिंदखेड राजा) येथील सरपंच द्वारकाबाई प्रभाकर सांगळे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव काल, चार ऑगस्टला सहा विरुद्ध दोन मतांनी पारित झाला.
३० जुलैला उपसरपंच नामदेव म्हसाजी बुधवत व इतर सदस्यांनी सरपंचांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यावर निर्णय घेण्यासाठी काल तहसीलदारांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत सरपंच व सात सदस्य मिळून आठ जण उपस्थित होते. मतमोजणीत विरोधात सहा तर बाजूने दोन मते पडली. त्यामुळे अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्याचे तहसीलदारांनी जाहीर केले. सदस्य बुधवत यांच्यासह श्रीराम सोनटक्के, विष्णू सांगळे, मीरा बुधवत, पूजा साळवे, नंदा नागरे, शोभा बुधवत आदी उपस्थित होते.