गायत्री शिंगणे यांना किती मते मिळाली हो......फक्त ५५८! प्रचारात दिसणाऱ्या कार्यकर्त्यांचीही मते पडली की नाही?
Nov 23, 2024, 20:52 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाची निवडणुक यंदा अत्यंत चुरशीची ठरली. महायुतीचे मनोज कायंदे आता सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले आहेत..डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा विधानसभेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच पराभव झाला आहे..दरम्यान डॉ. राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे या देखील या निवडणुकीत अपक्ष रिंगणात होत्या.. काका विरुद्ध पुतणी अशी लढत रंगत असल्याचे चित्र या ठिकाणी रंगवण्यात आले... मात्र ते सपशेल फेल ठरले.. या निवडणुकीत गायत्री शिंगणे किती मते घेतील? अशी चर्चा रंगत होती.. मात्र गायत्री शिंगणे यांना केवळ ५५८ मते मिळाली आहेत..या लढतीत त्या दहाव्या क्रमांकावर राहिल्या.. विशेष म्हणजे गायत्री शिंगणे जेव्हा प्रचाराकरिता मतदार संघात फिरत होत्या तेव्हा त्यांच्या प्रचार रॅलीतही ५५८ पेक्षा अधिक संख्या दिसत होती, मात्र सोबत असणाऱ्या लोकांची ही मते पडली की नाही? असा सवाल आता स्वतः गायत्री शिंगणे यांना पडला असावा अशी स्थिती आहे..
गायत्री शिंगणे यांच्यापेक्षा जास्त मते ही अपक्ष विजय गवई ५८३ मते, ॲड.सय्यद मुबीन ६३९ मते, अपक्ष सुनील जाधव ७०३ मते, स्वतंत्र भारत पक्षाचे दत्तात्रय काकडे २५०९ मते , राष्ट्रीय समाज पक्षाचे दत्तू रामभाऊ चव्हाण यांना ३५३५, वंचितच्या सविता मुंडे यांना १६६५८ मते मिळाली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर डॉ.शिंगणे तर तिसऱ्या क्रमांकावर डॉ.खेडेकर आहेत. गायत्री शिंगणे यांचा तब्बल ७२ हजार ८५५ मतांनी पराभव झाला आहे...