कुणाल बोंद्रे पत्‍नीसह काँग्रेसच्या वाटेवर; आठवडाभरात काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भाजपने हकालपट्टी केल्यानंतर चिखलीच्या नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे आणि त्यांचे पती कुणाल बोंद्रे पुन्हा त्यांचा मूळ पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता आहे. आठवडाभरात बोंद्रे दाम्पत्याचा काँग्रेस प्रवेश होण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी वर्तविली आहे. याच कामासंबंधात वरिष्ठांशी चर्चा करण्यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे सध्या मुंबईत असल्याचे समजते. आज, २० ऑक्टोबर रोजी बोंद्रे …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भाजपने हकालपट्टी केल्यानंतर चिखलीच्या नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे आणि त्यांचे पती कुणाल बोंद्रे पुन्हा त्यांचा मूळ पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता आहे. आठवडाभरात बोंद्रे दाम्पत्याचा काँग्रेस प्रवेश होण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी वर्तविली आहे. याच कामासंबंधात वरिष्ठांशी चर्चा करण्यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे सध्या मुंबईत असल्याचे समजते.

आज, २० ऑक्टोबर रोजी बोंद्रे दाम्पत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना भाजपने निलंबित केले. त्यामुळे बोंद्रे दाम्पत्य आता कोणत्या मार्गाने जाणार याचे उत्तरही लवकरच मिळणार आहे. कुणाल बोंद्रे यांच्यासोबत भाजपात आलेले त्यांचे काही सहकारीसुद्धा काँग्रेसमध्ये जाणार आहेत. पाच वर्षांपूर्वी काँग्रेसने प्रिया बोंद्रे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी नाकारून करुणा बोंद्रे यांना उमेदवारी दिली होती. एका रात्रीत भाजपमध्ये आलेल्या बोंद्रे यांना उमेदवारी दिली आणि भाजपच्या ताकदीमुळे त्या निवडूनही आल्या. मात्र मूळ काँग्रेसचे असलेल्या कुणाल बोंद्रे यांनी भाजपची शिस्त पाळणे जमले नसल्यानेच भाजपा त्यांच्यावर नाराज होती. याचा व्हायचा तो परिणाम झाल्याने पुन्हा एकदा काँग्रेसचा दरवाजा ठोठावण्याची वेळ बोंद्रे दाम्पत्यावर आली आहे.

Buldana Live Exclusive : गैरकारभारांची यादीच समोर… हकालपट्टीनंतर भाजपाच्‍या मागणीमुळे नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे अन्‌ कुणाल बोंद्रेंना करावा लागणार चौकशीचा सामना!!
सविस्‍तर बातमी वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा ः https://bit.ly/2Z4p41d

चिखलीच्या नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे, त्‍यांचे पती कुणाल बोंद्रेंची भाजपातून हकालपट्टी!; या दाम्‍पत्‍याच्‍या गैरव्यवहारामुळे पक्षाची बदनामी होत असल्याचा ठपका!!
सविस्‍तर बातमी वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा ः https://www.buldanalive.com/chikhli-mayor-priya-bondre-her-husband-kunal-expelled-from-bjp/