एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांकडे वेधले राज्‍य सरकारचे लक्ष!; आमदार श्वेताताई महालेंनी परिवहन मंत्र्यांना दिले पत्र

चिखली : कोरोनामुळे निधन पावलेल्या एस. टी. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ५० लाखांच्या विम्याचा लाभ देण्याची मागणी आमदार श्वेताताई महाले यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. आज, १६ जुलैला दिलेल्या पत्रात आमदार महाले पाटील यांनी म्हटले आहे, की कोरोना महामारीच्या काळात जीवावर उदार होऊन एस.टी. कर्मचाऱ्यांनी कर्तव्य निभावले. यात राज्यभरात ३०१ कर्मचाऱ्यांचे निधन …
 

चिखली : कोरोनामुळे निधन पावलेल्या एस. टी. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ५० लाखांच्या विम्याचा लाभ देण्याची मागणी आमदार श्वेताताई महाले यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्‍याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

आज, १६ जुलैला दिलेल्या पत्रात आमदार महाले पाटील यांनी म्हटले आहे, की कोरोना महामारीच्या काळात जीवावर उदार होऊन एस.टी. कर्मचाऱ्यांनी कर्तव्य निभावले. यात राज्यभरात ३०१ कर्मचाऱ्यांचे निधन झाले. कोरोनामुळे आजपर्यंत राज्यातील ८८९० एस. टी. कर्मचारी बाधित होऊन ८३९० कर्मचारी बरे झाले आहे. आजरोजी राज्यभरात २७०० एस. टी. कर्मचारी पॉझिटिव्‍ह असून, ८५० कर्मचारी दवाखान्यात तर उर्वरित गृह विलगीकरणात आहेत. राज्य शासनाने एस. टी. कर्मचाऱ्यांचा ५० लाखांचा विमा काढलेला असतानाही अद्यापपर्यंत कोणत्याही एस.टी. कर्मचाऱ्यांच्या निधन पावलेल्यांच्या कुटुंबियांना विम्याचा लाभ मिळालेला नाही. त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. विम्याचा व इतर लाभ देऊन तसेच मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आधार द्यावा. जेणेकरून त्यांच्‍या कुटुंबातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे आमदार महाले पाटील यांनी म्‍हटले आहे.