आमदार श्वेताताईंचा युवकांना मोलाचा सल्ला… म्हणाल्या, मोबाइलसोबत “यात’ हवी गोडी!
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लोकांच्या हाती मोबाइल आले अन् सर्वच बाबतीत जग हाताच्या बोटात सामावल्याने शारीरिक हालचाली कमी झाल्या. त्यामुळे आजारांचे प्रमाण वाढले . शारीरिक हालचाली कमी झाल्याने युवकांमध्ये हार्टअॅटॅकचे प्रमाण वाढू लागलेले असल्याने आजच्या तरुण पिढीने मोबाइलसोबतच व्यायाम करण्याचे डंबेल्सही हाती घ्यावे, असे आवाहन आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी चिखली विधानसभा मतदारसंघांतील विविध गावांत व्यायाम साहित्य वितरण प्रसंगी केले.
१० ऑक्टोबरला चिखली तालुका क्रीडा संकुल समितीच्या प्रांगणात व्यायाम साहित्य वितरण समयी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, की प्रत्येक गावात व्यायाम शाळा हे त्यांचे उद्दिष्ट असून, युवकांमध्ये व्यसनाची नव्हे तर व्यायामाची गोडी निर्माण होणे गरजेचे आहे. चिखली विधानसभा मतदारसंघातील चिखली तालुक्यातील सावंगी गवळी (पेनसावंगी), मुंगसरी, पळसखेड दौलत, शेलूद, बोरगाव वसू, पांढरदेव, सवणा, उंद्री, अमडापूर, ईसोली या गावांतील ग्रामपंचायतींना जवळपास 80 लक्ष रुपये किंमतीचे अत्याधुनिक व्यायाम साहित्याचे आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. चिखली विधानसभा मतदारसंघातील चिखली व बुलडाणा तालुक्यात 2. 30 कोटी रुपये किंमतीच्या व्यायाम शाळा बांधकाम व साहित्य तसेच क्रीडांगण विकासाची कामे मंजूर करण्यात आली आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती सौ. सिंधुताई तायडे होत्या. जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. उपसभापती शमशाद पटेल, पंचायत समिती सदस्या सौ. मनीषाताई सपकाळ, संजय महाले, प्रा. वीरेंद्र वानखेडे, संतोष काळे पाटील, सौ व्दारकाताई भोसले, बबनराव राऊत, अनमोल ढोरे पाटील, योगेश राजपूत, पंजाबराव देशमुख, बाळासाहेब पवार, श्री. वीर, श्री. इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला ईसोली सरपंच सुनील शेळके, सवणा सरपंच सौ. सत्यभामा सुरडकर, शेलूद सरपंच ज्ञानेश्वर मोरे, अनुराग भुतेकर, उमेश भुतेकर, अशोक चव्हाण हातागळे, गजानन दुधाळे, पळसखेड दौलत सरपंच नीरज गायकवाड, शिवदास वसू , मदन काकडे, संजय पवार, कय्यूम भाई आले हाेते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. धारपवार यांनी केले.