आज “ते’ चौघे कोण समोर आलेच नाही… आ. गायकवाड म्‍हणाले, गुन्हे दाखल झाल्यावर तुम्हाला कळेल!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गुन्हे दाखल झाल्यावर माझी गाडी जाळणारे “ते’ चौघे कोण आहेत हे तुम्हाला कळेलच, अशी प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी बुलडाणा लाइव्हला दिली. सुपारी देऊन, कट शिजवून माझी गाडी जाळण्यात आली. पोलीस यंत्रणा तपासात अपयशी ठरली तरी माझ्या यंत्रणेने याचा तपास केला आहे. सोमवारी त्यांची एसपींकडे तक्रार करणार असल्याचे विधान आमदार …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः गुन्हे दाखल झाल्यावर माझी गाडी जाळणारे “ते’ चौघे कोण आहेत हे तुम्हाला कळेलच, अशी प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी बुलडाणा लाइव्हला दिली.

सुपारी देऊन, कट शिजवून माझी गाडी जाळण्यात आली. पोलीस यंत्रणा तपासात अपयशी ठरली तरी माझ्या यंत्रणेने याचा तपास केला आहे. सोमवारी त्यांची एसपींकडे तक्रार करणार असल्याचे विधान आमदार गायकवाड यांनी आठ जुलैला पत्रकार परिषदेत केले होते. बुलडाणा शहरातील चार जणांचा गाडी जाळण्यात हात असल्याचेही ते म्हणाले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आज बुलडाणा लाइव्हने आमदार संजय गायकवाड यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, की या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या चौघांची नावे तुम्हाला कळेलच. याप्रकरणाची ऑनलाइन तक्रार देणार असल्याचेही ते म्हणाले. २६ मे रोजी भल्या पहाटे आमदार संजय गायकवाड यांच्या निवासस्थानासमोर उभी असलेली त्यांची इनोव्हा गाडी जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यात गाडीचा मागील भाग जळाला होता.