अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान; श्वेताताईंच्या सूचनेनंतर महसूल अधिकाऱ्यांकडून तातडीने नुकसानीची पाहणी; “पीकविमा काढला त्यांना तर द्याच, पण ज्यांनी विमा काढला नाही त्यांनाही मदत करण्याची मागणी’

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मागील वर्षी हजारो शेतकऱ्यांनी पीक विमा काढून आणि अतोनात नुकसान होऊनही पीकविमा कंपनीने कोणत्याही शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली नाही. त्यामुळे यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी पीकविमा काढलेला नाही. यावर्षी झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे सुरुवातीला पिकांची परिस्थिती खराब होती. मात्र ६ सप्टेंबरच्या रात्रीपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे बुलडाणा तालुक्यातील अटकळ, मेरखेड, देवपूर व परिसरातील नदी व …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मागील वर्षी हजारो शेतकऱ्यांनी पीक विमा काढून आणि अतोनात नुकसान होऊनही पीकविमा कंपनीने कोणत्याही शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली नाही. त्यामुळे यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी पीकविमा काढलेला नाही. यावर्षी झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे सुरुवातीला पिकांची परिस्थिती खराब होती. मात्र ६ सप्टेंबरच्या रात्रीपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे बुलडाणा तालुक्यातील अटकळ, मेरखेड, देवपूर व परिसरातील नदी व नाल्याच्या काठचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे ज्यांनी पीकविमा काढला त्यांना नुकसान भरपाई मिळणे हा त्यांचा हक्कच असून ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला नाही त्यांना सुद्धा शासनाने झालेल्या नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई देण्याची मागणी आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे केली आहे.

आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या सूचनेनुसार अटकळ व परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी भाजपा तालुकाध्यक्ष अध्यक्ष ॲड.सुनिल देशमुख, नायब तहसीलदार अमरसिंह पवार, चंद्रकांत काटकर मंडळ अधिकारी राऊत, तलाठी शेवाळे, धनंजय सोनोने, कृषी पर्यवेक्षक धाड, अनिल कडूबा कण्हेर, कृषी पर्यवेक्षक पाडळी यांची उपस्थिती होती.

काल पडलेल्या अति मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत होती. अनेक तास सारखा पूर आलेला होता. त्यामुळे पैनगंगा नदीला मिळालेले सर्व नाल्यांचे पाणी थांबलेले होते. पैनगंगा नाल्याचे पाणी घेतच नसल्याने नाल्यालगत सर्व शेतात पाणी घुसल्याने उभी पिके अनेक तास पावसात राहिल्याने सडून जातात. त्यामुळे त्या पिकांना कोणतेही उत्पादन होणार नसल्याने नदी काठच्या पिकांसोबतच नाल्याच्या पावसाने झालेल्या नुकसानीचा सुद्धा पंचनामे करण्याची मागणी भाजपा तालुका अध्यक्ष ॲड.सुनिल देशमुख यांनी यावेळी केली . झालेल्या अतिवृष्टीमध्ये शेकडो हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे पाईप व स्प्रिंकलर सेट वाहून गेले. अनेक घरात व गोठ्यात पाणी घुसुन नासाडी झाली. विहिरी गाळाने भरल्या. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अनंता डुकरे, संजय झुंबड, कुंदन गायकवाड, प्रवीण गाडेकर, संतोष पाटील, रमेश भोपळे, संतोष पुंडलिक खोडे, अशोक मानसिंग राजपूत, राम दगडू शेळके, गजानन संपत आमले, तेजराव संपत आमले, शालीकराम दत्ता खडके, राजू गुलाबसिंग राजपूत, बबन तुकाराम शेळके, शिवाजी खोडे, श्रीराम शेळके, ज्ञानदेव नरोटे, सुनील कोल्हे, रामधन शेळके, राजू शेळके, गणपत जगताप, चतरसिंग राजपूत, कृष्णा खोडे, गोपाल खोडे, समाधान बिबे, नामदेव नप्ते, रघु शेळके, सुनील रामदास शेळके, आत्माराम शेळके, सुखराम खोडे, आत्माराम कोल्हे, उत्तम कोल्हे, उत्तम कोल्हे, विठ्ठल बारोटे, अमोल खोडे तसेच स्थानिक भाजपा शाखा अध्यक्ष व भाजपा पदाधिकारी यांची उपस्थिती होती.