स्वराज्य पक्षाच्या जिल्हा प्रवक्तेपदी मेहकरचे योगेश चौहान! म्हणाले,जिल्ह्यात संघटन बांधणी मजबूत करणार..
Jun 26, 2023, 19:03 IST
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या स्वराज्य पक्षाने आता बुलडाणा जिल्ह्यातही आपली पाळेमुळे रोवायला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात संघटना बांधणी मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून स्वराज्य पक्षाचे जिल्हा प्रवक्ता म्हणून मेहकर येथील योगेश चौहान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
स्वराज्य पक्षाचे बुलडाणा जिल्हा युवा प्रमुख भूषण प्रतापजी निंदाने यांनी एका नियुक्तीपत्राद्वारे ही नियुक्ती केली आहे. जिल्ह्यात आपण मजबूत संघटन बांधून पक्षवाढीसाठी पावले उचलाल अशी अपेक्षा जिल्हा युवा प्रमुखांनी व्यक्त केली आहे. शेतकरी, कामगार,सहकार, शिक्षण आणि आरोग्य या पंचसुत्रिला धरून छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात ताकदीने संघटन उभे करणार असल्याचे यावेळी योगेश चौहान यांनी म्हटले आहे.