लिहा गावांत प्रेमलता सोनोने यांचा झंजावती प्रचार दौरा! म्हणाल्या, माझा स्वाभिमानी बाणा; बुलडाण्याच्या विकासासाठी जीवाचे रान करीन; शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत तुमच्यासाठीच लढणार...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवूनच मी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत तुमचीच सेवा करणार आहे. मी स्वाभिमानी बाण्याची आहे, त्यामुळे बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील गेल्या पाच वर्षातील चित्र पाहून मी अस्वस्थ झाले होते..त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी छत्रपती संभाजीराजे भोसलेंनी आपल्याला उमेदवारी दिली आहे.२० ऑक्टोबरला मतदान रुपी आशीर्वाद देऊन या विकासाच्या लढाईत मला विजयी करावे असे आवाहन बुलडाणा विधानसभा मतदारसंघाच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवार प्रेमलता सोनोने यांनी केले. १४ नोव्हेंबरच्या सायंकाळी, मोताळा तालुक्यातील लिहा येथे आयोजित प्रचारदौऱ्या दरम्यान मतदारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
यावेळी पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, बुलडाणा विधानसभा मतदारसंघात केवळ विकासाचे गाजर दाखवण्यात आले. प्रत्यक्षात मात्र कोणतेही कामे झाले नाहीत. मतदारसंघातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचलाच नाही असा आरोपही प्रेमलता सोनोने यांनी केला. येणाऱ्या काळात बुलडाणा विधानसभा मतदारसंघात सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी माझी आहे असेही त्या म्हणाल्या.