ढालसावंगी व येवता येथील कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश! आमदार श्वेताताई म्हणाल्या,
मुस्लिम व दलित समाज काँग्रेसच्या दुश्प्रचारातून बाहेर पडतोय ही भाजपाच्या सर्व समावेशक धोरणांची पावती
Dec 28, 2023, 10:58 IST
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भारतीय जनता पक्षाचा प्रभाव व प्रचार - प्रसार समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचत असून आजवर काँग्रेसच्या दुष्पप्रचारात अडकलेला मुस्लिम समाज व दलित बांधव मोठ्या संख्येने भाजपात सामील होत आहेत ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जनहितकारी कार्याची व भाजपाच्या समावेशक धोरणांची पावती असल्याचे प्रतिपादन आ. श्वेताताई महाले यांनी केले. आ. महाले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ढालसावंगी व येवता येथील अनेक ग्रामस्थांनी दि. २६ डिसेंबर रोजी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला, याप्रसंगी केलेल्या स्वागतपर भाषणात आ. श्वेताताई महाले यांनी वरील विचार व्यक्त केले.
शहरी व ग्रामीण भागात मूलभूत नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासह विकासाचा झंजावात निर्माण करणाऱ्या आ. श्वेताताई महाले यांच्या अभूतपूर्व विकासकार्यामुळे समाजातील सर्व घटकांमध्ये समाधान व्यक्त होत असून आ. महाले यांना प्रत्येक स्तरातून दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत आहे. परिणामी मोठ्या विविध जाती धर्मातील महिला, पुरुष व युवक भारतीय जनता पक्षात सहभागी होत आहेत. याचाच एक भाग म्हणून ढालसावंगी व येवता येथील रहमान ठेकेदार, शेख सुलतान शेख साहेब, शेख जाफर शेख लुकमान, शेख अब्दुल्ला शेख लाल, कदीर टेलर, जूमा शां करीम शहा, फारुक शेठ, इम्रान खान, श्री शेख मोसिम, मंजूर शेठ, शंकर भिंगारे, रामेश्वर गवळी, सचिन गवळी तसेच मौजे येवता येथील श्री तेजराव बनकर माजी सरपंच, भगवान काळे, हभप वसंतराव परिहार, उत्तमराव परिहार, रामकिसन सोळंकी, दिनकर बनकर माजी सरपंच यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या सर्वांना भारतीय जनता पक्षाचे चिन्ह असलेला दुपट्टा देऊन आ. श्वेताताई महाले यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.