विकासकामे आणि राष्ट्रहिताच्या भूमिकेतून श्वेताताई महाले यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करा; विजय पवार यांचे आवाहन

 
(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):उद्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान पार पडणार आहे. तत्पूर्वी चिखली मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार आ. श्वेताताई महाले यांनी केलेल्या विकासकामांची पोचपावती म्हणून व श्वेताताई नेहमीच हिंदुत्व आणि राष्ट्रहिताच्या भूमिकेतून कार्य करत असल्याची जाणीव ठेवून हिंदूराष्ट्र सेनेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व माझ्या समर्थकांनी श्वेताताई महाले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन हिंदूराष्ट्र सेनेचे जिल्हाप्रमुख विजय पवार यांनी केले आहे. 

  चिखली विधानसभा मतदारसंघात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीरिपा, रयत क्रांती संघटना महायुतीच्या उमेदवार आ. श्वेताताई महाले यांना शहर व ग्रामीण परिसरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. श्वेताताई महाले यांचा विजय  होणार हे निश्चित आहे. या  विजयाचे वाटेकरी होण्यासाठी  चिखली मतदारसंघातील  हिंदूराष्ट्र सेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या  बूथवरील प्रत्येक मत श्वेताताई महाले यांनाच कसे मिळेल त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी असे आवाहन विजय पवार यांनी केले आहे. आपल्या पहिल्याच कार्यकाळात सुरुवातीची अडीच वर्षे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये वाया गेल्यानंतर उर्वरित अडीच वर्षाच्या महायुती सरकारच्या कार्यकाळात श्वेताताई महाले यांनी " न भूतो न भविष्यती " अशी कोट्यावधी रूपांची विकासकामे चिखली मतदारसंघात करून दाखवली. त्यामुळे येथील सर्वसामान्य जनतेच्या जीवनात परिवर्तन घडू लागले आहे.  याशिवाय महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या रक्षणासाठी व राष्ट्रहितासाठी महायुतीचे सरकार येणे ही काळाची गरज आहे. या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवून सर्व हिंदुत्वनिष्ठ विचाराच्या मतदारांनी आ. श्वेताताई महाले  यांना भरभरून मतदान करावे व जास्तीतजास्त मताधिक्याने त्यांना विजयी करावे असे आवाहन विजय पवार यांनी केले आहे.