एकत्र लढणार की वेगळे? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात देवेंद्र फडणवीसांचे बुलडाण्यातून महत्त्वाचे विधान! म्हणाले, अपवादात्मक परिस्थितीत...

 

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विजयराज शिंदे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी बुलढाण्यात आले होते. यावेळी त्यांनी म्हाडा कॉलनी जवळ भाजपच्या जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजन केले. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात महत्त्वाचे विधान केले.. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढणार की वेगवेगळ्या असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता..

allowfullscreen

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महायुती म्हणून आम्ही एकत्रच लढणार आहोत. अपवादात्मक परिस्थितीत काही जिल्ह्यांमध्ये, एखाद्या महानगरपालिकेत किंवा एखाद्या जिल्हा परिषदेत वेगळे लढण्याचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेऊ शकतात. मात्र तो निर्णय देखील आम्ही सामंजस्याने घेऊ. ओव्हरऑल आम्ही महायुती म्हणून एकत्र लढणार आहोत असे ना.फडणवीस म्हणाले. यावेळी ना .फडणवीस यांनी संजय राऊत यांची देखील खिल्ली उडवली.