जयश्रीताई शेळके शिवसेनेत जाणार? काय खरं काय खोटं..

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  काँगेसच्या प्रदेश सरचिटणीस आणि फायरब्रँड नेत्या जयश्रीताई शेळके या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करीत असल्याची कुजबुज आज दुपारपासून सुरू झाली. हल्लीच्या राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, कोण कधी कोणत्या पक्षात जाईल याचा नेम नसल्याने ही चर्चा जोरात पसरली.. सायंकाळी काही सोशल मीडिया हॅण्डलवरून देखील जयश्रीताई शेळकेंच्या शिवसेना प्रवेशा संदर्भात बातमी पसरत होती..नेहमी प्रमाणेच काही सुज्ञ वाचकांनी "बुलडाणा लाइव्ह" ला फोन करून खरं काय अशी विचारणा केली..अखेर स्वतः जयश्रीताई शेळके यांनी "बुलडाणा लाइव्ह" कडे याबाबत स्पष्टीकरण दिले.
 

"जयश्रीताई शेळके शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांच्या संपर्कात होत्या.त्या मातोश्रीवर जाऊन आल्या, प्रवेशाची तारीख निश्चित झाली, तिकिटाचे देखील ठरले.. परंतु बुलडाण्याचे स्थानिक पदाधिकारी मातोश्रीवर गेले काँग्रेसच्या लोकांना जर तिकीट द्यायचे असेल तर आमच्या निष्ठावांतांचं काय? असा सवाल करीत त्यांनी प्रवेशाचा विरोध केला त्यामुळे जयश्रीताई शेळके यांचा प्रवेश नाकारण्यात आला" अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू होती. सायंकाळी तशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली.  दरम्यान बुलडाणा लाइव्ह ने यासंदर्भात जयश्रीताई शेळके यांची भूमिका जाणून घेतली.

 मी मातोश्री वर आजपर्यंत कधी गेले नाही. उद्धव ठाकरे आमच्या महाविकास आघाडीचे नेते आहेत.मी त्यांना भेटले असते  सोशल मीडियावरून कळवले असते. मात्र उद्धव ठाकरेंशी किंवा शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यांशी शिवसेनेत प्रवेश करण्याची चर्चा झालेली नाही मी काँग्रेसमध्ये प्रदेशाची जबाबदारी सांभाळत आहे, त्यामुळे शिवसेनेत जाण्याचा प्रश्नच नाही. काही विरोधकांना आपली भीती वाटत असेल त्यांनीच अशी अफवा पसरवली असेल.." असे जयश्रीताई शेळके म्हणाल्या.
 
ही आहे व्हायरल पोस्ट..