क्या बात... आक्रोश मोर्चात जालिंधर बुधवतांनी आसूड उगारला अन्....
Sep 23, 2024, 13:47 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा शहरात आज उबाठा शिवसेनेच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. अभूतपूर्व आणि अतिवराट असा जनसागर या मोर्चाच्या निमित्ताने शहरात उसळला आहे. खा.अरविंद सावंत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या मोर्चात सहभागी झालेले आहेत. या अतिवराट गर्दीच्या मोर्चाने बुधवंत यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे..
दरम्यान आजच्या मोर्चात जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांचे नवे रूप पाहून शिवसैनिकांमध्ये चांगलाच उत्साह संचारला. जालिंधर बुधवंत यांनी हाती आसूड घेत गरागरा फिरवला..यावेळी कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला, आली रे आली मशाल आली या घोषणा शिवसैनिकांनी दिल्या.. बुधवंत यांच्या या कृतीने मोर्चेकर्यांमध्ये चांगलाच उत्साह संचारला. विशेष म्हणजे शहरातील मुख्य चौक असलेल्या जयस्तंभ चौकात जालिंदर बुधवंत यांनी आसूड उगारणे हे राजकीय विश्लेषकांच्या नजरेतून सुटले नाही...