संदीपदादांमध्ये आम्हाला बच्चू भाऊ दिसतात! भावना व्यक्त करतांना दिव्यांग बांधवांच्या डोळ्यांत पाणी; संदीप शेळकेंनी घेतला दिव्यांग बांधवांचा मेळावा

 

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संदीप दादांचे आमच्यावर मोठे उपकार मदत आहेत. आम्ही दिव्यांग आहोत म्हणून आतापर्यंत कोणत्याही पुढाऱ्याने आम्हाला विचारले नाही, मदत तर दूरच, मात्र संदिपदादांनी आम्हाला विश्वासात घेतले. आमच्या अडचणी समजून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. कोणतीही सत्ता नसतांना दादांनी आमच्यासाठी काम केलं त्यामुळे दादांना संसदेत पाठवण्यासाठी जिल्ह्यातील सगळे दिव्यांग बांधव काम करतील, दादांमध्ये आम्हाला बच्चू कडू दिसतात अशा भावना दिव्यांग बांधवांनी व्यक्त केल्या. मोताळा येथे दिव्यांग बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, या मेळाव्याला संदीप शेळके यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे संबोधित केले.

बुलडाणा लोकसभेसाठी अपक्ष रिंगणात असलेले संदीप शेळके यांना विविध क्षेत्रातून मोठा जनाधार मिळताना दिसत आहे. विविध संघटनांनी शेळके यांना पाठींबा जाहीर केला आहे. दिव्यांग बांधव देखील संदीप शेळकेंच्या पाठीशी आहेत. संदीप शेळके यांच्या अर्ज भरण्याच्या दिवशी देखील दिव्यांग बांधवांनी मोठी उपस्थिती दर्शवली होती. काल मोताळा येथे आयोजित मेळाव्याला मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते. या मेळाव्यात बोलताना संदीप शेळके यांनी "तुम्ही माझ्या कुटुंबातील सदस्य आहात, त्यामुळे दिव्यांग बांधवांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एक स्मार्ट कार्ड असावे, त्यामाध्यमातून दिव्यांग बांधवांना लाभ मिळेल" अशी आपली संकल्पना असल्याचे स्पष्ट केले. दिव्यांग बांधवांना त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार कामाची उपलब्धता करून देण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी अनेक दिव्यांग बांधवांच्या डोळ्यात पाणी आले होते.यावेळी राजेश पुरी, भगवान लेनेकर, सुनील वराडे, सुरेश जवंजाळ, अंकुश असोलकर, समशेर खा. पठाण, मो निसार या दिव्यांग बांधवांसह अनेकांची उपस्थिती होती.