जळगाव जामोद तालुक्यातील गोळेगांव बु चे ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार टाकणार ! काय आहे कारण...

 
 जळगाव जामोद(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जळगांव जामोद तालुक्यातील गोळेगांव बु येथील ग्रामस्थ विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहे. तशा आशयाचे निवेदन ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे..

Related img.

गोळेगांव बु. गट नंबर ७४ हे गावठाण जिगाव प्रकल्प यादी मध्ये अंशतः बाधित दाखवले आहे. दर्शक नकाशाप्रमाणे ते पूर्णतः बाधित यादीत समाविष्ट करून मिळावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसे न झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन गावकऱ्यांनी दिली आहे...