चिखली तालुक्यातील ग्रामस्थांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला एकाच छताखाली; आमदार श्वेताताईंच्या पुढाकारातून शासन चिखलीकरांच्या दारी..

 

चिखली(गणेश धुंदळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शासन आपल्या दारी हे ब्रीद घेऊन जनकल्याणाकारी योजनांचा प्रत्येक नागरिकाला  लाभ मिळतो आहे.विविध शासकीय विभाग मार्फत पुरविण्यात येणारे पारदर्शक- गतिमान पद्धतीने एकाच छताखाली निपटारा होताना दिसत आहे. चिखली येथे मौनीबाबा संस्थांनात  शासन आपल्या दारी हा उपक्रम पार पडला. आमदार  श्वेताताई महाले पाटील  यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन आज,२७ मे रोजी करण्यात आले होते.

 शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत तहसील कार्यालय,पंचायत समिती नगरपालिकाविभाग,जि.प. शिक्षण विभाग,महीला बालकल्याण विभाग, कृषी विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा, रोजगार हमी योजना, मानव विकास  इत्यादी विविध शासकीय कार्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यात आली. तसेच त्यामध्ये पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या मंजूर योजनेचा प्रत्यक्ष लाभ व त्याबाबतचे बाबत या पत्रांचे वाटप करण्यात आले. शासनाच्या योजनांची माहिती व लाभ घेण्यासाठी सर्व ग्रामीण भागातील नागरिकांची या दरबारात मोठ्या संख्येने उपस्थिती होती.ज्यांना शासनाच्या योजनेमध्ये अर्ज सादर करून मंजुरी मिळाली आहे त्यांना प्रमाणपत्र व प्रत्यक्ष लाभ देण्यात आला.या मध्ये  योजनेमार्फत  पात्र लाभार्थ्यांना साहित्य सुद्धा आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना आ.श्वेता ताई महाले पाटील यांनी महाराष्ट्र शासन  मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब गोरगरीब वाड्या वस्त्या तांड्यावरील गोरगरीब - वंचित - घटकांना एकत्र सर्वतोपरी मदत मिळून देण्यासाठी वचनबद्ध- कटीबद्ध आहेत असे प्रतिपादन केले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार, चिखली तहसीलदार सुरेश कव्हळे, नायब तहसीलदार  संजय टाके, पंचायत समिती बीडीओ भारसाखळे, आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे,नगरपालिका मुख्याधिकारी यांचेसह भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अँड.विजयकुमार कोठारी, डॉ. प्रतापसिंग राजपुत, रोहित खेडेकर,प्रा. वीरेंद्र वानखेडे, भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ.कृष्णकुमार सपकाळ, शहराध्यक्ष पंडितराव देशमुख यांच्यासह शासकीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी  उपस्थित होते.