नरेंद्र खेडेकरांच्या विजयी प्लॅनिंगसाठी वंजारी समाजाची बैठक हाऊसफुल्ल! जालिंधर बुधवंत म्हणाले, समाज निष्ठावान माणसाची कदर करणारा; प्रा.खेडेकर म्हणाले,
वंजारी समाजाचे उपकार विसरणार नाही, मुंडे साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करीन...
लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांनी शून्यातून विश्व उभारले. साहेबांचे समाजासाठी खूप मोठे योगदान आहे. प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या मुंडे साहेबांना समाजाने साथ दिली आणि मुंडे साहेबांनी आपल्या कार्यकर्तुत्वाने समाजाचे ऋण फेडले. मुंडे साहेब माझ्यासाठी आयडॉल आहेत, दैवत आहेत असे प्रतिपादन प्रा.नरेंद्र खेडेकर यांनी केले. यावेळी मुंडे साहेबांच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना प्रा.खेडेकर भावूक झाले होते. वंजारी समाजाने पाठीशी राहण्याचा निर्णय घेतल्याबद्दल खेडेकर यांनी आभार मानले. तुमच्या आशीर्वादाने आपला विजय होणारच आहे, समाजासाठी मला अर्ध्या रात्री फोन करा, नरेंद्र खेडकर तुमच्यासाठी सदैव हजर आहे, मुंडे साहेबांच्या विचारांवर त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून संसदेत काम करीन, वंजारी समाजाचे उपकार मी कधीही विसरणार नाही असेही प्रा. खेडकर यावेळी म्हणाले.