वन बुलडाणा मिशनच्या परिवर्तन रथयात्रेला मेहकर तालुक्यात भरभक्कम प्रतिसाद! आज "या" गावात पोहचणार यात्रा; कसा असेल आजचा यात्रेचा मार्ग? जाणून घ्या...
Mar 12, 2024, 08:14 IST
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)वन बुलडाणा मिशनची परिवर्तन रथयात्रा रविवार पासुन मेहकर तालुक्यात आहे. या यात्रेला भरभक्कम प्रतिसाद मेहकर तालुक्यांत मिळत असल्याचे चित्र आहे. आज मंगळवार, १२ मार्च रोजी मेहकर तालुक्यातील नियोजित गावांमध्ये परिवर्तनाचा जागर ही रथयात्रा करणार आहे.
वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. आज सकाळी ८:३० वाजता अंजनी येथून आजच्या दिवसाची सुरूवात होईल. त्यानंतर ९ वाजता आंधृड, १० वाजता वरूड येथे रथयात्रा पोहोचणार आहे. त्यानंतर ठीक ११ वाजता घाटबोरी,११:३० च्या सुमारास इसवी तसेच दुपारी ४:३० वाजेच्या वेळी पांगरखेड,५:३० वाजता बेळगाव, आणि सायंकाळी ६ वाजता डोणगाव आणि ६:३० वाजता नागापूर येथे आजच्या दिवसाचा समारोप होईल.