अवकाळी पाऊस आणि गारपीटीने वाताहत झालेल्या कुटुंबांना वन बुलडाणा मिशनच्या वतीने किराणा किटचे वाटप! 

 
संग्रामपूर(बुलडाणा लाईव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत ठिकठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीटीने थैमान झाले. संग्रामपूर तालुक्यातील गावांना याचा सर्वाधिक फटका बसला. दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे वाताहत झालेल्या कुटुंबांना वन बुलडाणा मिशनच्या वतीने किराणा किटचे वितरण करण्यात आले.
                  Add.
संग्रामपूर तालुक्यातील अनेक गावांत गारपीट आणि अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. काही घरांवरील टीनपत्रे उडाली तर काही घरांत अवकाळीचे पाणी घुसल्याने घरातील जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले. वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने किराणा किट वाटप करण्याच्या सूचना वन बुलडाणा मिशनच्या स्वयंसेवकांना दिल्या. वन बुलडाणा मिशनच्या टीमने एकलारा, बानोदा, धामणगाव, गोतमारे यासह परिसरातील गावांत पोहचून गरजू कुटुंबीयांना किराणा कीटचे वितरण केले.