तंबाखूमुक्त युवा अभियानाचा केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते शुभारंभ! ना. जाधवांचा युवकांना मोलाचा सल्ला, तंबाखूपासून दूर रहा म्हणाले...

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): युवकांनी तंबाखू , सिगारेट सारख्या व्यसनापासून दूर रहावे असे आवाहन केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.देशात तंबाखूमुक्त युवा अभियान राबविण्यात येणार आहेत.नवी दिल्ली येथील लेडी हार्डिग वैद्यकीय महाविद्यालयात आज, २४ सप्टेबरला त्यानिमित्य आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

 या अभियानाचा मुख्य उद्देश तरुणांना तंबाखू सेवनापासून दुर ठेवणे हा आहे. तंबाखू सिगारेटमुळे होणाऱ्या आजाराविषयीची माहिती समाजाला देऊन त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे .भावी पिढीच्या निरोगी आयुष्यासाठी त्यांना तंबाखू सिगारेट सारख्या व्यसनापासून ठेवण्यासाठी युवकांमध्ये तंबाखूच्या दुष्परिणामाविषयी माहिती देऊन जागृकता निर्माण करणे गरजेचे आहे अस प्रतिपादन केंद्रीय आयुष , आरोग्य व कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

तंबाखू सिगारेट यासारख्या घातक उत्पादकाच्या विरोधात सरकारच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. या अभियानात सर्वांनी सहभागी होऊन याला लोक चळवळीचे स्वरूप प्राप्त करून देणे गरजे आहे . एक निरोगी आणि तंबाखूमुक्त समाज निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी पुढे यावे. आपल्या भावी पिढीच्या सुरक्षेतेसाठी तंबाखूमुक्त जीवन हा संकल्प करू असे आवाहन ना. प्रतापराव जाधव यांनी यावेळी केलं ...

ना. जाधवांनी दाखविला झेंडा...
तंबाखू सिगारेटच्या सेवनाचे दुष्परिणाम आणि आजाराविषयी समाजात जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाच्यावतीने तंबाखूमुक्त युवा अभियान राबविण्यात येत आहे.या अभियानाच्या शुभारंभ निमित्य जनजागृती मोटरसायकल रॅलीचा प्रारंभ केंद्रीय आयुष, आरोग्य व कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी झेंडा दाखवुन केला