केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडून दंगलग्रस्त धाडची पाहणी; मुळाशी जाऊन दोषींवर कारवाई करा; पोलिस यंत्रणेला दिल्या सूचना....
Dec 2, 2024, 09:17 IST
धाड(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ३० नोव्हेंबरच्या रात्री धाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विशिष्ट समाजातील युवकांनी धुडगूस घातला होता. त्यानंतर दोन विभिन्न समाजात राडा झाला होता, त्यात दगडफेक होऊन काही वाहनांची जाळपोळ देखील झाली होती. त्यानंतर प्रशासनाकडून धाड मध्ये जमावबंदी लागू करण्यात आली होती. दरम्यान काल, १ नोव्हेंबरच्या सायंकाळी केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव यांनी धाड येथे जाऊन वस्तुस्थिती जाणून घेतली..
दंगल प्रकरणाच्या मुळाशी जाऊन दोषींवर कारवाई करा. धाड परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज चेक करा. निर्दोष नागरिकांना या घटनेत गोऊ नका मात्र समाजविघातक कृत्य करणाऱ्यांना सोडू नका अशा सूचना यावेळी केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव यांनी पोलीस यंत्रणेला दिल्या...