केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव उद्या बुलडाण्यात! जिल्हा नियोजन समितीची महत्वाची बैठक...

 
बुलडाणा(अक्षय थिगळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव आज,२६ जुलैच्या रात्री उशिरा जिल्ह्यात पोहचणार आहेत. उद्या ते बुलडाणा शहरात येणार आहेत. जिल्हा नियोजन समितीची महत्वाची बैठक उद्या होणार आहे या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत.

 Advt.👆

आज रात्री साडेअकरा वाजता मेहकर येथील निवासस्थानी ते मुक्कामी पोहचतील. उद्या,२७ जुलैला सकाळी साडेनऊ वाजता बुलडाण्याकडे प्रस्थान करतील. सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ४ वाजता गर्दे वाचनालयाला सदिच्छा भेट दिल्यानंतर सोयीनुसार ते मेहकरकडे प्रस्थान करतील.