केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी फुंकले रणशिंग! कार्यकर्त्यांना म्हणाले,स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा; मलकापुरात संघटन बांधणी...

 
 मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव काल मलकापूर दौऱ्यावर होते. या दरम्यान त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी प्रतापराव जाधव यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकत भगवा फडकवण्यासाठी जोमाने तयारीला लागण्याचे आवाहन केले..

  जनतेच्या आशीर्वादाने चौथ्यांदा लोकसभेत पोहोचलो. मंत्रीपदाची जबाबदारी ही मिळाली. विधानसभेत देखील महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिला. हे कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आहे, कोणताही पक्ष हा कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच मोठा होत असतो. शिवसेना हा पक्ष सामान्य कार्यकर्त्याला मोठा करणारा पक्ष आहे. आगामी लोकसभा निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत..त्यामुळे आता त्यासाठी जोमाने तयारीला लागा असे ना.प्रतापराव जाधव म्हणाले. मलकापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या या संघटनात्मक बैठकीला जिल्हाप्रमुख ओमसिंह राजपूत, शांताराम दाणे, उपजिल्हाप्रमुख संतोष डिवरे, शहर प्रमुख किशोर नवले, तालुकाप्रमुख विजय साले, नांदुरा शहर प्रमुख अनिल जांगडे, नांदुरा तालुकाप्रमुख सुनील जुनारे, मुकेश लालवानी, उमेश हिवरकर, उमेश राऊत आदींची उपस्थिती होती...