केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज चिखलीत! खा.प्रतापराव जाधवांच्या प्रचारार्थ घेणार जाहीर सभा...

 
चिखली(ऋषी भोपळे :बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज चिखली शहरात येत आहेत. खा.प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ ते जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. चिखली शहरातील जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या मागील मैदानात सकाळी ११ वाजता ही जाहीर सभा होणार आहे.

                      Advt

खासदार प्रतापराव जाधव यांची ही चौथी लोकसभेची निवडणूक आहे. ३ निवडणुकांच्या प्रचाराचा अनुभव असल्याने त्यांनी या निवडणुकीत देखील प्रचारात कोणतीच कसर सोडली नाही. शेवटच्या टप्प्यात काल खामगावात झालेली प्रचारसभा अतिविराट अतिविशाल अशीच ठरली. त्याआधी चिखलीत झालेला गोविंदाचां रोड शो, धाड मध्ये झालेली रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांची सभा आणि दुसरबीड मध्ये झालेली पंकजाताईंची सभा सुपरहिट ठरली. आज विकासपुरुष अशी ओळख असलेल्या नितीन गडकरी यांची सभा चिखलीत होणार आहे, या सभेला राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील देखील उपस्थित राहणार आहेत. महायुतीचे जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी या सभेला उपस्थित राहणार आहेत. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.