केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आज तिसऱ्यांदा जिल्ह्यात!  डोक्यात लोकसभेचा प्लॅन; बुलडाण्यात संध्याकाळी जाहीर सभा

 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):केंद्रीय श्रम, रोजगार, वन, पर्यावरण व जलवायू परिवर्तन मंत्री भूपेंद्र  यादव आज ९ आणि १० जून रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. आज ९ जून रोजी हिंगोली वरून सकाळी साडेनऊ वाजता त्यांचे मेहकर येथे आगमण होणार आहे. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता देऊळगाव राजा येथे त्यांची भाजपाच्या ज्येष्ठ कार्यकत्यांसोबत संवाद बैठक होणार आहे. भूपेंद्र यादव यांचा हा गेल्या ६ महिन्यांतील  तिसरा  बुलडाणा जिल्हा दौरा आहे. बुलडाणा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी भूपेंद्र यादव यांच्याकडे देण्यात आली आहे.

ना. भूपेंद्र यादव दुपारी अडीच वाजता चिखली येथील हॉटेल स्वरांजली चिखली येथे देखील कार्यकर्त्यांसोबत बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता तेथेच व्यापारी संमेलन होणार आहे. त्यानंतर ४. ४५ वाजता बुलढाणा येथे आगमन होईल. बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी येथे पत्रकारांशी ते सवांद साधणार आहेत तर सायंकाळी ५ वाजता गर्दे वाचनालय येथे जनसभा होणार आहे. या सभेनंतर शेगावकडे प्रयाण करून मुक्काम करतील. १० जून रोजी सकाळी ९ वाजता पांडुरुग कृपा कुणबी समाज भवन शेगाव येथे लाभार्थी संमेलन, त्यानंतर १०.१५ वाजता शेगाव वरून वरवट काल कडे रवाना. सकाळी १०.३० वाजता सहकार विद्या मंदिर वरवट बकाल येथे संयुक्त मोर्चा बैठक होणार आहे. त्यानंतर

११.४५ वाजता विकास तीर्थ निमखेडी ता. जळगाव जामोद तर दुपारी १२.१५ वाजता आ. संजय कुटे यांच्या निवासस्थानी भेट आणि त्यानंतर दुपारी २ हॉटेल पुष्पाजंली खामगाव येथे प्रसार माध्यमांच्या कार्यकत्यांशी बैठक व त्यानंतर दुपारी ३ वाजता खामगावकडून छत्रपती संभाजी नगर कडे प्रयाण असा त्यांचा नियोजित दौरा आहे.