मुख्यमंत्री होण्याची गुणवत्ता उद्धव ठाकरेंत नाही; नारायण राणेंची चिखलीत टीका
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यासाठीची आवश्यकता गुणवत्ता उद्धव ठाकरे यांच्यात नाही, अशी टीका करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नवाब मलिकावरही शरसंधान साधले. मलिक कोण आहेत, त्यांचे जावई काेण आहेत... त्यांनी आधी स्वतःचे बॅकग्राऊंड पहावे आणि मगच दुसऱ्यावर टीका करावी, असे राणे म्हणाले. बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर अत्यंत खालच्या शब्दांत त्यांनी टीका केली. कुठे भुंकायचं हे त्यांना चांगलं माहीत आहे. कुत्रा सोडून त्यांनी कुणाची संगत केली नाही, अशी टिपण्णी केली.
चिखली अर्बन बँकेतर्फे आयोजित उद्योजकता प्रोत्साहन व प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनासाठी श्री. राणे चिखलीत आले होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी त्यांनी थोडावेळ संवाद साधला. आमदार संजय गायकवाड यांचा आवाज विधानसभेत कधी आवाज नाही. तिकडे बोलताना दिसत नाहीत. कुठे भुंकायचं हे त्यांना चांगलं माहीत आहे. कुत्रा सोडून त्यांनी कुणाची संगत केली नाही म्हणून त्यांना दुसरे उदाहरण देता येत नाही. त्यांना तिकडे बोलायला सांगा. तिकडे बोलता येत नाही म्हणून ते इकडे बोलतात. मी सध्या शिवसेनेला धुवायचं काम करतोय. हा निरोप त्यांना सांगा, असे नारायण राणे म्हणाले.
बुलडाणा अर्बन बँकेने सहकार मंत्री अशोक चव्हाण यांच्या साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाबाबत सध्या आयकर विभागाकडून तपासणी सुरू आहे याबद्दल विचारले असता ते म्हणाले, की यासंदर्भात सहकार मंत्री अमित शहा यांना सांगून चौकशी लावण्यात येईल. महाराष्ट्रातील आघाडी सरकार किती दिवस टिकेल यावर "साडेसात' या एका शब्दात त्यांनी उत्तर दिले. साडेसात महिने, वर्ष, दिवस याबद्दल मात्र त्यांनी पुन्हा विचारूनही स्पष्ट बोलणे टाळले.
बुलडाणा जिल्ह्यासाठी उद्योजकता प्रशिक्षणाकरिता दोन प्रशिक्षण केंद्रं देऊ. एनसीबीचे अधिकारी समीर वानखडे यांच्या पाठिशी भाजप सरकार आहे का, असे विचारले असता श्री. राणे म्हणाले, मी मोदीसाहेबांना विचारतो की आपण पाठीमागे आहोत का? समीर वानखेडे "ईडी'च्या संपर्कात असतात व त्याचा खुलासा अधिवेशनात करण्यात येईल, या मालिकांच्या दाव्यावर ते म्हणाले, की विधानसभेत आमचे १०५ शिलेदार आहेत. देवेंद्र फडवणीस तिथे सक्षम आहेत. येणाऱ्या दोन वर्षांत शिवसेनेतील अनेक नेते भाजपमध्ये येणार आहेत. त्यांची तपासणी करून आम्ही त्यांना भाजपात प्रवेश देऊ. अनेक शिवसैनिक सेना नेतृत्वावर नाराज असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला.