तोताराम कायंदे यांचा अभिष्टचिंतन सोहळा उद्या

दुसरबीडला येणार केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पंकजाताई मुंडे
 
 
सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः माजी आमदार, भगवान बाबा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्‍थापक अध्यक्ष तोताराम कायंदे यांचा अमृत महोत्‍सव अभिष्टचिंतन सोहळा उद्या, २० नोव्‍हेंबरला दुपारी साडेबाराला दुसरबीड येथील नारायणराव नागरे महाविद्यालयात आयोजित केला आहे. केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्‍ते अभिष्टचिंतन केले जाणार असून, यावेळी माजी ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे या अध्यक्षस्‍थानी असणार आहेत.
यावेळी तोताराम कायंदे यांच्यावरील गौरवग्रंथाचे प्रकाशनही होणार आहे. आरोग्‍यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजीमंत्री संजय कुटे, महादेव जानकर, एकनाथ खडसे, बबनराव लोणीकर, रणजित पाटील, खामगावचे आमदार ॲड. आकाश फुंडकर, चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले, बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक, चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त, मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमूलकर यांची विशेष उपस्‍थिती राहणार आहे.