उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलडाणा शहरात! असा आहे मिनिट टू मिनिट प्रोग्राम...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या गुरुवार, दि. १९ रोजी बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर येणार असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.
 
Advt.
Advt.

 मुख्यमंत्री श्री. शिंदे हे उद्या दुपारी दूपारी १२:२० वाजता एमएसआरटीसी वर्कशॉप मागील हेलीपॅड येथे आगमन व मोटारीने कार्यक्रमस्थळी प्रयाण करतील. दुपारी १३:३० वाजता बुलढाणा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी १ वाजता राखीव. दुपारी १:१५ वाजता मोटारीने शारदा ज्ञानपीठ हायस्कुल, बुलढाणाकडे प्रयाण करुन दुपारी १:३० वाजता मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार व प्रसार कार्यक्रम व इतर महापुरुष व संतांचे पुतळयाचे ई अनावरण कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी ३:३० वाजता मोटारीने एमएसआरटीसी वर्क शॉप मागील हेलीपॅड बुलढाणाकडे प्रयाण करुन छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.