महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ.संजय रायमुलकरांचा आजचा दौरा "असा"! सकाळी १० वाजता गुंधा, सायंकाळी मातरखेड, मोहोतखेड, निजामपूर, वेणी मध्ये भेटी - गाठी; कॉर्नर बैठकांवर भर ..

 
 मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. डॉ.संजय रायमुलकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून आधीच प्रचारात आघाडी घेतली आहे. २४ ऑक्टोबरला हजारोंच्या गर्दीच्या साक्षीने त्यांनी अर्ज भरला, त्यानंतर गावो गावी भेटी गाठी, पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकी याद्वारे प्रचाराचे अत्यंत काटेकोर असे नियोजन सुरू आहे. आज, २८ ऑक्टोबरला आमदार डॉ.संजय रायमुलकर लोणार तालुक्यातील गावांचा दौरा करणार आहेत..सकाळी १० वाजता गुंधा येथे आमदार संजय रायमुलकर पोहचणार आहेत. सायंकाळच्या सत्रात ७ वाजता मातरखेड, ८ वाजता मोहोतखेड, ९ वाजता निजामपुर, १० वाजता वेणी असा आमदार रायमुलकर यांचा दौरा असणार आहे..

 या दौऱ्यात महायुतीचे पदाधिकारी डॉ.संजय रायमुलकर यांच्यासमवेत असतील. गावातील भेटी - गाठी, बैठका असे या दौऱ्याचे स्वरूप असणार आहे.दरम्यान एकाबाजूला आ.डॉ.संजय रायमुलकर यांच्यासाठी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने प्रचारात झोकून दिलेले असताना दुसऱ्या बाजूला विरोधी गटात मात्र अंतर्गत कलह सुरू आहे. त्यामुळे या सगळ्या बाबी लक्षात घेता आ. रायमुलकर यांचा मार्ग सुकर होतांना दिसत आहे .