अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस! चिखलीत राहुल बोंद्रे, बुलडाण्यात जयश्री शेळके, सिंदखेडराजात डॉ.शशिकांत खेडेकर भरणार अर्ज...

 
  
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज,२९ ऑक्टोबरला शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी सगळीकडे झुंबड उडणार आहे. सिंदखेड राजा मतदारसंघाचा तिढा काल, रात्री उशिरा सुटला आणि अखेर डॉ.शशिकांत खेडेकर यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडली आणि तीही शिवसेनेकडूनच.. सिंदखेड राजाची जागा शिवसेनेला सुटावी.. उमेदवारही आमचाच अनेक चिन्हही आमचेच असावे असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी या जागेसाठी प्रचंड आग्रह केला. अखेर अजित पवारांनी माघार घेतली.आता आज प्रचंड शक्ती प्रदर्शन करीत शशिकांत खेडेकर आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. दुसरीकडे चिखलीत महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल बोंद्रे आणि बुलडाण्यात जयश्रीताई शेळके आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत...
  चिखलीत राहुल बोंद्रे नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. दुपारी २ वाजता राजा टॉवर चौकात जाहीर सभा होणार असून खा.मुकुल वासनिक या सभेला संबोधित करणार आहेत. दुसरीकडे बुलडाण्यात महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके या आपला अर्ज भरणार असून मुकुल वासनिक आणि सुषमा अंधारे या सभेला संबोधित करणार आहेत...