चिखली मतदारसंघातील जनतेला डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा संदेश ; म्हणाले राहुल बोंद्रेंना विजयी करा...

 
 चिखली(बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): निवडणूक आता तीन दिवसांवर आलेली आहे. प्रत्येक ठिकाणी ज्येष्ठ नेत्यांना पोहोचणे शक्य होत नसल्याने आता सोशल माध्यमाचा पुरेपूर वापर सध्या सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी देखील चिखली विधानसभा मतदारसंघातील जनतेला एक व्हिडिओ संदेश पाठवला आहे. महाविकास आघाडीचे चिखली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुल बोंद्रे यांना विजयी करण्याचे आव्हान त्यांनी यात केले आहे. 
डॉ.राजेंद्र शिंगणे म्हणाले की, चिखली विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना विनंती करतो की, महाविकास आघाडीचे राहुल सिद्धिविनायक बोंद्रे हे पंजा या निशाणीवर निवडणूक लढवत आहेत. त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्या, असे आवाहन त्यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात केले आहे.