मेहकरची वाट लवणाऱ्यांच्या विरोधात ही निवडणूक! जनतेने परिवर्तनाचा निर्धार केलाय! डॉ.ऋतजा चव्हाण यांची प्रतिक्रिया! म्हणाल्या, जनतेने संधी दिल्यास मतदारसंघाचा कायापालट करून दाखवणार....
Oct 15, 2024, 17:06 IST
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ३० वर्षात मेहकर आणि लोणारला भकास करण्याचे पाप सत्ताधाऱ्यांनी केले.लोणार सारखे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असून देखील त्यांना काहीही करता आले नाही..मतदारसंघात कुठेही जा विकासाच्या नावाने बोंब आहे..एवढा ऐतिहासिक वारसा असताना यांच्या कर्मदरिद्रीपणामुळे मतदारसंघाची वाट लागली आहे. त्यामुळे ही निवडणूक मेहकर विधानसभेची वाट लावणाऱ्या प्रस्थापितांच्या विरोधात ताकदीने लढणार आहे अशी प्रतिक्रिया युवा नेत्या डॉ.ऋतुजा चव्हाण यांनी दिली आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर डॉ.ऋतुजा चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली...
पुढे बोलतांना डॉ.ऋतुजा चव्हाण म्हणाल्या की मेहकर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवावी हा जनतेचा आग्रह आहे. मतदारसंघातील जनतेला आता सक्षम पर्याय हवा आहे, त्यामुळे लोकांच्या आग्रहास्तव निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाल्या.
सत्ताधारी खासदार आणि आमदारांच्या जोडीने मेहकरचे वाटोळे केले आहे. राज्यात २८८ विधानसभेचे मतदारसंघ आहेत, मात्र विकासाच्या बाबतीत सर्वात वाईट अवस्था मेहकर विधानसभेची असल्याचे त्या म्हणाल्या.. मतदारसंघातील शेतकऱ्यांचे, बेरोजगार तरुणांचे प्रश्न विधानसभेत ते मांडत नाहीत. त्यांना मतदारसंघातील प्रश्नांशी काही देणे घेणे नाही, स्वतःची खुर्ची राखण्यासाठी ते धडपडत आहेत.मात्र यावेळी त्यांची खुर्ची मोडली जाणार एवढे निश्चित आहे असा घणाघात डॉ.ऋतुजा चव्हाण यांनी केला. जनतेने संधी दिल्यास मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचेही त्या म्हणाल्या...