बत्तीस वर्षीय युवकाची गळफास घेवून आत्महत्या;खामगाव तालुक्यातील घटना..!

 
 खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बत्तीस वर्षीय विवाहित युवकाने लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना खामगाव तालुक्यातील बोरी-अडगाव'मध्ये उघडकीस आली आहे.
निलेश महादेव सुरवाडे (३२) रा. रा.बोरी - अडगाव असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.निलेश हा ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान बोरी - अडगाव शिवारातील महादेव टिकार यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला खाटीच्या नायलॉन दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. अशी तक्रार मिलिंद सुरवाडे याने खामगाव ग्रामीण पोलिसात दिली आहे.पुढील तपास नापोकॉ बाळकृष्ण फुंडकर करीत आहेत.बातमी लिहे पर्यंत निलेश'ने आत्महत्या का केली याचे कारण कळू शकले नाही.