शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर दिसला "संयमाचा" आक्रोश! बुलडाणा जिल्ह्यातील सत्ताधारी आमदारांसाठी धोक्याची घंटा? 

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मातृतीर्थ बुलडाणा जिल्हा गेल्या पंधरवड्यामध्ये आंदोलनांनी गाजला. यामध्ये शेतकऱ्यांच्या पीक विमा आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेने काढलेल्या आक्रोश मोर्चा ने अक्षरशः बुलडाणा दणादले होते.👇

शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांच्या नेतृत्वात बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील हा मोर्चा सत्ताधाऱ्यांसाठी सूचक असा ठरला तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या रक्ताने लिहिलेले निवेदन पोलिसांनी फाडल्यामुळे काँग्रेसने केलेले आंदोलन लक्षवेधी ठरले. तिकडे मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीतही ठाकरे गटाचे दिलीप वाघ यांनी आंदोलनात्मक फोडलेली डरकाळी घाम फोडणारी ठरली. शिवाय एरवी शाळेत शांततेत शिकवणारे आणि शिस्तबद्ध असलेले शिक्षक यांचा जिल्हा मुख्यालती निघालेला अभूतपूर्व मोर्चा देखील सत्ताधाऱ्यांनाच धडकी भरवणारा ठरला आहे.

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात काँग्रेसने त्यांना शेतकऱ्यांच्या रक्ताने लिहिलेले निवेदन देण्याचा प्रयत्न केला. सुरक्षेचे कारण पुढे करून पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना अडवले, यावेळी झालेल्या झटापटीत पोलिसांनी ते निवेदनच फाडले. यामुळे काँग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसले, त्याआधी आ.संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात केलेल्या जीभ छाटण्याच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद देखील काँग्रेसकडून उमटले..एकंदरीत या दोन्ही घटना दुर्दैवी असल्या तरी काँग्रेस पुन्हा पेटून उठू शकते हे यातून समोर आली. गटातटात विभागलेली बुलडाणा काँग्रेस याप्रसंगी एक झालेली दिसली.👇

बुधवतांच्या संयमी नेतृत्वाचा आक्रोश...
Related img.
बुलडाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेना जिल्हाप्रमुख जलिंधर बुधवंत यांच्या नेतृत्वात गत महिन्यात मशाल यात्रा निघाली. या यात्रेला गावागावात जबरदस्त असा प्रतिसाद मिळाला. या यात्रेचा समारोप बुलडाण्यातील आक्रोश मोर्चाने झाला.विभागीय नेते खा.अरविंद सावंत आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भाषणे वादळी झाली. या भाषणावेळी गर्दीतून ज्या उस्फुर्त पद्धतीने शिट्ट्या आणि टाळ्या वाजत होत्या तो खरेतर सत्ताधऱ्यांसाठी सूचक इशाराच होता. जिजामाता प्रेक्षागार मैदानाजवळून निघालेला हा आक्रोश मोर्चा संगम चौक, जयस्तंभ चौक, बाजार गल्ली कारंजा चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला..मोर्चात सहभागी अतिविराट गर्दीमुळे भगवी लाट उसळल्याचे एकंदरीत चित्र बुलडाणा शहरात होते.👇
बुलडाण्यातील सत्ताधारी आमदारांचा स्वभाव पाहता त्यांच्या विरोधात लोक फारसे रस्त्यावर येत नाहीत हा समज या मोर्चाने "गैरसमज" ठरवला. शिवसेना फुटीनंतर जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांनी ज्या संघटन कौशल्याने उद्धव ठाकरेंवर निष्टा असणाऱ्या निष्ठावंत शिवसैनिकांचे नेतृत्व केले..शिवसेना केवळ जिवंतच ठेवली असे नव्हे तर मजबूत संघटन उभे केले ते वाखानण्याजोगे आहे..आक्रोश मोर्चाने तर बुधवंत यांच्या "संयमी" नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.👇
Related img.
 दुसरीकडे सिंदखेडराजात जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांच्या मार्गदर्शनात माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप वाघ यांनी काढलेला आक्रोश मोर्चा देखील परिवर्तनाची चाहूल देणारा ठरला. त्याआधी काढलेली मशाल यात्रा देखील दिलीप वाघ यांनी गाजवली. गत ३० वर्षांपासून प्रस्थापित असलेल्या डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्यासमोर दिलीप वाघ यांनी शड्डू ठोकला आहे.या मतदारसंघावर उबाठा शिवसेनेने दावा ठोकला आहे. जागा वाटपात हा मतदारसंघ उबाठा शिवसेनेला सुटलाच तर मशाल यात्रा आणि आक्रोश मोर्चाच्या रूपाने दिलीप वाघ यांनी केलेली पेरणी त्यांना चांगला नफा मिळवून देणारी ठरू शकते.👇
​​​​​
  शिक्षकांचा मोर्चा...
जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी शिक्षकांनी बुलडाण्यात जिल्हा कचेरीवर मोर्चा काढला. हा मोर्चा देखील विराट ठरला.. मागण्या मान्य करून घे शिक्षकांची झालेली एकजूट सत्ताधाऱ्यांसाठी अडचणीची अशीच आहे. विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत जुनी पेन्शन योजनेचा फटका भाजपने अनुभवला आहे. आता विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना शिक्षकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणे सत्ताधारी महायुतीला अडचणीचे ठरू शकते.. एकंदरीत गत पंधरवड्यात जो "संयमाचा आक्रो" दिसला तो बुलडाणा जिल्ह्यातील सत्ताधारी आमदारांसाठी धोक्याची घंटा वाजवणारा ठरला आहे...