जिल्ह्यातील तरुण एकवटतोय; तरुणांचा रविकांत तुपकरांना मिळतोय जोरदार पाठिंबा!
रविकांत तुपकरांच्या निर्धार परिवर्तन यात्रेला शेगाव तालुक्यात मिळाला जोरदार प्रतिसाद

 
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी,कष्टकरी, तरुण आणि सर्वसामान्य जनता आज मोठ्या प्रमाणात निर्धार परिवर्तन यात्रेला प्रतिसाद देत आहेत. गावोगावी मिळणारा हा प्रतिसाद मला लढण्याचे बळ देत आहे. सर्वसामान्य जनतेचे हेच आशीर्वाद आता जिल्ह्यात परिवर्तन घडविणार, असा विश्वास रविकांत तुपकर यांनी शेगाव तालुक्यातील दौऱ्यात बोलतांना व्यक्त केला. तर जिल्ह्यातील तरुण आता एकवटत असून तुपकरांना तरूणांचा जोरदार पाठिंबा मिळत आहे.
 
                       Add 
रविकांत तुपकरांची निर्धार परिवर्तन यात्रा दि.२७ व २८ फेब्रुवारी रोजी शेगाव तालुक्यात होती. या परिवर्तन यात्रेला प्रत्येक गावातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. निधन परिवर्तन यात्रा २७ फेब्रु. रोजी शेगाव तालुक्यातील मनसगाव, पहूरपूर्णा, खातखेड, बोंडगाव, भोनगाव, सगोडा, चिंचखेड, भास्तन, डोलारखेड, माटरगाव बु. या गावांमध्ये पोहचली येथे रविकांत तुपकरांनी शेतकऱ्यांच्या, तरुणांच्या व गावातील प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. अवकाळी पावसाने व गारपीरने झालेल्या नुकसानाची देखील त्यांनी या भागात पाहणी केली. सायंकाळी माटरगाव बु. येथे झालेल्या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तर २८ फेब्रुवारीला सातव्या दिवशी शेगाव तालुक्यातील शिरसगाव, कनारखेड, गायगाव खु., चिंचोली, कालखेड, पाडसुळ, आडसुळ, पाळोदी, मानेगाव व झाडेगाव या गावांमध्ये सुद्धा परिवर्तन यात्रेचा दौरा झाला. या सर्व ठिकाणी रविकांत तुपकरांचे जोरदार स्वागत करण्यात आले. निर्धार परिवर्तन यात्रेला उदंड प्रतिसाद मिळत आहे.
मिळणारा हा प्रतिसाद म्हणजे शेतकरी, कष्टकरी, तरुण आणि सर्वसामान्य जनतेचे प्रेम आणि आशीर्वादच आहेत. आता हेच सर्वसामान्यांचे आशीर्वाद जिल्ह्यात परिवर्तन घडवतील याची खात्री आहे, असा विश्वास रविकांत तुपकरांनी बोलतांना व्यक्त केला. गावगाड्यातील कष्टकरी, शेतकरी, सर्वसामान्य जनता आणि तरूण हीच आपली खरी संपत्ती आहे. अशा भावना देखील तुपकरांनी यावेळी व्यक्त केल्या. खामगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद व आता शेगाव तालुक्यात निर्धार परिवर्तन यात्रेला मिळणारा प्रतिसाद आता दिवसेंदिवस वाढतच असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.