मासरूळच्या युवकांचा मनोज दांडगेंवर विश्वास! राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतला प्रवेश...
Jul 24, 2024, 11:26 IST
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोज दांडगे यांनी पक्ष संघटनेवर चांगलाच जोर दिला आहे. गावागावात पक्षप्रवेशांचे जोरदार कार्यक्रम दांडगे यांच्या नेतृत्वात होत आहे. लोकांप्रती असलेली तळमळ, सामान्यांचे प्रश्न सोडवण्याची धडपड यामुळे मनोज दांडगे यांच्यावर युवकांचा चांगलाच विश्वास बसला आहे.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका चिखली, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिखली विधानसभा मतदारसंघ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिखली शहर यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मासरुळ जिल्हा परिषद सर्कल मधील तरुणांनी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज दांडगे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पक्षात जाहीर प्रवेश केला.
मासरूळ जिल्हा परिषद सर्कल मध्ये मनोज दांडगे यांच्या कामाची चर्चा नेहमीच ऐकायला मिळते.कधी विविध सामाजिक उपक्रमामुळे तरी कधी विविध प्रकारच्या आंदोलनामुळे तर कधी कार्यकर्ते यांच्या संघटनामुळे.चिखली येथील आयोजित कार्यक्रमात पवन अंबादास सपकाळ,सुनील सपकाळ, प्रेम सुरडकर, पवन अपार ओम पवार,गोलू बिडकर यांच्यासह अनेकांनी श्री.दांडगेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मासरूळ गाव आता राष्ट्रवादीमय होत आहे.
कार्यकर्त्यांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.तसेच मासरूळ येथील राष्ट्रवादी काँग्रेस युवक शाखेच्या शाखा अध्यक्ष पदी शुभम नारायण नरवाडे,किरण हरिभाऊ बोराडे यांची शाखा कोषाध्यक्ष तर दीपक सुपडा सपकाळ यांची शाखा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून नियुक्ती पत्र प्रदान केले.या कार्यक्रमाच्या प्रसंगी गणेश नरवाडे पाटील,राहुल गुळवे,विष्णु गुळवे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..