बुलडाण्यात उबाठा शिवसेना फुटली! शहर प्रमुख आणि युवा सेनेच्या शहरप्रमुखाचा राजीनामा... 

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नामुष्की जनक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर उबाठा शिवसेनेला नाराजीचे ग्रहण लागले आहे. पदाधिकारी पक्ष सोडत आहेत, आता बुलढाण्यात शहरप्रमुख हेमंत खेडेकर आणि युवा सेनेचे शहर प्रमुख सचिन परांडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांच्याकडे हा राजीनामा पाठवण्यात आला आहे..
सचिन परांडे आणि हेमंत खेडेकर यांनी काल ,२६ फेब्रुवारीला राजीनामा दिला. लोकसभा विधानसभा निवडणुकीत दिलेल्या जबाबदारीला प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला.मात्र सध्याची स्थिती, मतदार संघामध्ये संघटने अंतर्गत घडामोडी पाहता संघटनात्मक बांधणीच्या अनुषंगाने पदाचा राजीनामा दिल्याचे राजीनामा पत्रात म्हटले आहे..