आज दुपारी ठरणार डोंगरखंडाळ्याचा नवा सरपंच! प्रज्ञा कांबळे यांचे नाव आघाडीवर 

 
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ) जिल्ह्यातील तसेच बुलडाणा विधानसभा मतदार संघातील महत्त्वाचे सत्ताकेंद्र असलेल्या डोंगर खंडाळा नगरीचा सरपंच आज ठरणार आहे. २०ऑगस्टला सरपंच असलेले बबन तुलाराम गाडगे यांच्यावर अविश्वास आणला होता.१३ विरुद्ध १ मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाला होता.त्यामुळे गाडगे यांचे सरपंच पद गेले होते. आता नव्या सरपंच निवडीसाठी आज दुपारी सभेचे आयोजन तहसीलदारांनी केले आहे .सद्या सरपंचांवर अविश्वास आणणाऱ्या गटाकडून नवीन सरपंच पदासाठी प्रज्ञा कांबळे यांचे नाव पुढे केले जात आहे. दुसऱ्या गटाकडून कुणाचे नाव समोर केले जाते हे अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे सध्या तरी प्रज्ञा कांबळे यांचे नाव सरपंच पदासाठी आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. आज दुपारी त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.