शेतकऱ्यांना पीकविम्या पोटी सर्वाधिक नुकसान भरपाई महायुती सरकारच्या काळातच!काँग्रेसने तर हप्त्यापोटी शेतकरी बांधवांकडून जमा झालेली रक्कम ही गिळली! 

आमदार श्वेताताईंनी समोर आणलेल्या माहितीवरून महाविकास आघाडी तोंडावर पडली; महायुतीची १ रुपयात पीक विमा योजना ठरली सुपरहिट..

 
 चिखली:(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गतकाळात पिक विम्याच्या प्रश्नावरून महाविकासआघाडीने बऱ्याचदा महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. महायुती सरकारवर बेछूट आरोप देखील केले. मात्र आमदार श्वेताताईंनी कृषी आयुक्तालयाला मागितलेल्या माहितीवरून आता महाविकास आघाडी सरकार तोंडघशी पडली आहे. पिक विमा संदर्भात शेतकऱ्यांना सर्वाधिक नुकसान भरपाई देण्यात महायुती सरकारच अग्रेसर असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. याउलट काँग्रेस शासन काळात तर शेतकऱ्यांनी पिक विमा पोटी भरलेली रक्कम देखील तत्कालीन सरकारने गिळली असल्याचेच आकडेवारी दर्शवते.दरम्यान काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा शेतकऱ्यांबद्दलचा पुळका नकली आहे. शेतकऱ्यांची कल्याण खऱ्या अर्थाने करण्याची क्षमता महायुती सरकारमध्येच असल्याची प्रतिक्रिया आ. श्वेताताई महाले यांनी दिली आहे..
२००४ -५ ते २०२४ -२५ या काळात कृषी विभागामार्फत राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय पीक विमा योजना व प्रधानमंत्री पिक विमा योजनांमधील शेतकरी बांधवांकडून जमा झालेली विमा हप्ता रक्कम व मंजूर नुकसान भरपाई रक्कम याबाबतची माहिती आमदार श्वेताताईंनी मागितली होती. कृषी आयुक्तालयाकडून आमदार श्वेताताईंना ही माहिती पुरवण्यात आली असून ही आकडेवारी महाविकास आघाडीचा दुटप्पीपणा समोर आणणारी ठरली आहे.२००४ ते २०१४ या काळात अगदी तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना मिळत होती. त्या तुलनेत महायुती सरकारच्या कार्यकाळात मात्र भरभक्कम नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या पदरात पडली आहे. 
अशी आहे तफावत...
२००४-५ या काळात ५६.४५ कोटी शेतकऱ्यांनी हप्ता म्हणून भरले होते, त्या बदल्यात १४५.१६ कोटी मदत देण्यात आली.२००५ -६ मध्ये ४९.७२ कोटींच्या बदल्यात ३२.५१ कोटी,२००६-७ मध्ये ३८.४५ कोटींच्या बदल्यात १४०.५९ कोटी,२००७ -८ मध्ये ३२.१२ कोटी शेतकऱ्यांकडून घेतले त्याबदल्यात ८६.३१ कोटी शेतकऱ्यांना देण्यात आले.२००८ -९ मध्ये ७४.८१ कोटींच्या बदल्यात ४७३.९१ कोटी, २००९ -१० मध्ये १०३.१८ कोटींच्या बदल्यात ३७६.२६ कोटी,२०१०-११ मध्ये ५१.८९ कोटींच्या बदल्यात केवळ १४.९७ कोटी, २०१२-१३मध्ये ९२.९१ कोटींच्या हप्त्यात ७६७.२७ कोटी,२०१३ -१४ मध्ये ११७ कोटींची वसुली शेतकऱ्यांकडून करण्यात आली त्या बदल्यात शेतकऱ्यांना केवळ १०३.२४ कोटी एवढी रक्कम देण्यात आले...
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले अन्...
दरम्यान २०१४ मध्ये केंद्रात आणि राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर मात्र शेतकऱ्यांना पीक विम्याच्या नुकसानी पोटी भरभक्कम मदत मिळू लागली. २०१४-१५ या आर्थिक वर्षात १९८.०६ कोटींच्या हफ्त्यात शेतकऱ्यांना १८०६.५७ कोटी रुपये मिळाले.२०१५-१६ मध्ये ४६८.२१ कोटींच्या बदल्यात ५०९८.८८ कोटी, २०१६-१७ मध्ये ५८६.६७ कोटींच्या बदल्यात १९२४.७२ कोटी २०१७-१८ मध्ये ४१७.७४ कोटींच्या बदल्यात २७०७.८१ कोटी, २०१८-१९ मध्ये ६१२.४७ कोटींच्या हफ्त्यात ४४६८.०१ कोटी एवढा भरीव निधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी मिळाला.
१ रुपयांत पीक विमा योजना ठरली सुपरहिट...
२०२३ -२४ मध्ये १ रुपयामध्ये पिक विमा योजना सुरू करण्यात आली. ही योजना अतिशय सुपरहिट ठरली. शेतकऱ्यांना प्रति अर्ज केवळ एक रुपया रक्कम जमा करायची आणि उर्वरित रक्कम शासनाने भरायची अशी ही योजना आहे. या योजनेअंतर्गत २०२३-२४ मध्ये केवळ २ कोटी ४३ लाख रुपयांच्या बदल्यात तब्बल ७ हजार ६८८ कोटी ३२ लाख रुपये एवढी भरभक्कम मदत नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.