जालिंधर बुधवतांच्या नेतृत्वावर जनसामान्यांची मोहोर! मशाल यात्रेतून होणारा जागर परिवर्तनाची नांदी देणारा! संदीप शेळके यांचे प्रतिपादन...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांच्या नेतृत्वात बुलडाणा विधानसभा मतदारसंघात निघालेल्या मशाल जागर यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. प्रतिकूल परिस्थितीत देखील न डगमगता बुधवंत यांनी आपल्या नेतृत्वाची छाप सोडली आहे.लढवय्या शिवसैनिक कसा असतो हे त्यांनी दाखवून दिले आहे.त्यामुळेच त्यांच्या नेतृत्वावर जनसामान्यांची मोहोर उमटवली आहे. मशाल यात्रेत होणारा जागर हा परिवर्तनाची नांदी देणारा आहे असे प्रतिपादन संदीप शेळके यांनी केले. जालिंधर बुधवंत यांच्या नेतृत्वात बुलडाणा विधानसभा मतदारसंघात निघालेल्या मशाल जागर यात्रेत सहभागी होत संदीप शेळके यांनी संबोधन केले,यावेळी ते बोलत होते.
 
Advt 
पुढे बोलतांना संदीप शेळके म्हणाले की, राज्यात जे सरकार आहे ते अतिशय असंवेदनशील आहे. दररोज शेतकरी आत्महत्या करत आहेत मात्र सरकारला काहीही देणेघेणे नाही. ते फक्त खुर्ची टिकवण्यासाठी काम करत आहेत. कमिशनखोरी वाढली आहे, कमिशनशिवाय कोणतेही काम होत नाही. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत जनता या खोके सरकारला हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असेही संदीप शेळके म्हणाले. यावेळी जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांच्यासह उपजिल्हा प्रमुख सुनील घाटे, अपंग सेलचे जिल्हा प्रमुख रामदास सपकाळ, तालुका प्रमुख लखन गाडेकर, तालुका संघटक राजु बोरसे, युवासेना उपजिल्हा प्रमुख शुभम घोंगटे, डॉ अरुण पोफळे, अशोक गव्हाणे, सुधाकर सुरडकर, बाजार समिती संचालक संजय दर्डा, राजु मुळे, युवासेना ता प्र संजय शिंदे, विजय इतवारे, ओमप्रकाश नाटेकर, अनंता शिप्पलकर, गजानन कुकडे, गणेश पालकर, सागर घोंगटे, भागवत शिकारे, ओबोसी सेलचे संदीप पाटील, गुलाबराव व्यवहारे, मोहम्मद सोफियान, राहुल जाधव, समाधान बुधवत, रवी गोरे, सुधाकर आघाव, श्रावण बोरकर, अनिल राणा, निलेश पाटील, विशाल पाटील, सुभाष तामगर, किरण हुंबड, सुनील पाटील, भास्कर शिंदे, गजानन देवाजी पालवे, कमलाकर पालवे, गोपाल जवरे, रामेश्वर बुधवत, बबन खरे, बाळासाहेब सिनकर, गोविंद दळवी राजेंद्र लोखंडे, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.