BREKING वन बुलडाणा मिशनच्या ऐतिहासिक बुलडाणा परिवर्तन पदयात्रेला थोड्याच वेळात होणार सुरुवात! संदीप शेळके म्हणाले, आता परिवर्तन अटळ, आई जगदंबेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी...
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वन बुलडाणा मिशनचे संकल्पक तथा राजर्षी शाहू परिवाराचे संस्थापक संदीप शेळके यांच्या बहुचर्चित बुलडाणा परिवर्तन पदयात्रेला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. या यात्रेची जय्यत तयारी झाली असून २५ किलोमिटरची ही पदयात्रा राहणार आहे. बुलडाण्याचे आराध्य दैवत माता जगदंबेच्या मंदिरातून या यात्रेला सुरुवात होणार असून चिखलीचे आराध्य दैवत रेणुका मातेचा चरणावर नतमस्तक होऊन यात्रेचा समारोप होणार आहे. दरम्यान संदीप शेळके यांनी घरून निघतांना माध्यमांशी संवाद साधला. "आता परिवर्तन अटळ आहे. जिल्ह्याला एका नव्या उंचीवर घेऊन जायचे आहे. आई जगदंबा आणि आई रेणुकाईचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. जिल्ह्याच्या मागासलेपणासाठी कारणीभूत असलेल्या सगळ्या दुर्जन शक्तींचा संहार आता होणार आहे." असे संदीप शेळके म्हणाले.
थोड्याच वेळात जगदंबा मातेची आरती झाल्यानंतर पदयात्रेला सुरुवात होणार आहे. जिल्हाभरातून हजारो युवक,युवती, शेतकरी ,महिला या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी बुलडाणा शहरात दाखल झालेले आहेत. बुलडाणा लाइव्ह वर या पदयात्रेचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे...!