अंचरवाडीचे रुपडे पालटणार! आमदार डॉ.राजेंद्र शिंगणेंनी भरभरून दिले; आज,१७ कोटी रुपयांच्या विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा...

 
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील अंचरवाडी येथे आज एका मोठ्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी उपलब्ध करून दिलेल्या १७ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण आज होणार आहे. यामुळे अंचरवाडी - वसंतनगर नगरीचे रुपडे पालटणार आहे..
Advt.👆

 आज,११ ऑक्टोबरच्या सायंकाळी ६ वाजता अंचरवाडी येथील श्री.हनुमान मंदिर , छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर हा भव्य दिव्य असा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच सौ. कोकिळाताई परिहार या राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वायाळ, तालुकाध्यक्ष बाळाभाऊ पवार, उपसरपंच सौ. ज्योतीताई परिहार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

Advt.👆
  या कामांचे भूमिपूजन,लोकार्पण...
अंचरवाडी फाटा ते शेळगाव आटोळ या रस्त्याची मागणी कित्येक दिवसांपासून होत होती. आता ९ कोटी ५६ लाख रुपये खर्चून या रस्त्याचे काँक्रिटीकरण होणार आहे. ३ कोटी रुपयांचे ३ सिमेंट बंधारे,५० लाख रुपयांचे तलाठी भवन,२० लक्ष रुपये खर्चून अंचरवाडी ते भरोसा रस्त्याचे खडीकरण,७१ लक्ष रुपयांची राष्ट्रीय पेयजल योजना, ४० लक्ष रुपयांचा अंचरवाडी ते प्रिप्री रस्ता, मूलभूत सुविधा अंतर्गत २६ लाख रुपयांचे काँक्रिट रस्ता बांधकाम, सामाजिक न्याय विकास योजनेअंतर्गत १० लक्ष रुपयांचे रस्ता बांधकाम, आमदार स्थानिक विकास योजनेअंतर्गत १० लाख रुपयांचे रस्ता बांधकाम, नवीन स्मशानभूमी बांधकामासाठी १० लाख रुपये, दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत १२ लाख रुपयांचा काँक्रीट रस्ता, नागरी सुविधा योजनेअंतर्गत ७ लक्ष रुपयांचे बांधकाम, ९ लक्ष रुपयांचे हिंदूसूर्य महाराणा प्रताप पुतळा सौंदर्यीकरण, ग्रामपंचायत स्थर १५ व्या वित्त आयोगातून ५० लक्ष रुपयांची कामे, राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत नवीन विहीर/पाण्याची टाकी व अंतर्गत पाईपलाईन असे ७८ लाख रुपयांचे काम, वसंत नगर येथील २० लाख रुपयांच्या संरक्षण भिंतीचे काम, तलाव दोस्ती साठी ७० लाख व व स्मशानभूमी पेपर ब्लॉक बसविण्यासाठी ७ लाख रुपये अशा एकूण १७ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अंचरवाडी ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले आहे.