EXCLUSIVE लगीन सराई सुरू झाली, बेपत्ता होणाऱ्या मुलींची संख्या वाढली! जानेवारीच्या पहिल्या दहा दिवसांत जिल्ह्यातून २५ जणी झाल्या गायब....
Advt 👆
Advt👆
१८ वर्षांवरील मुली किंवा मुले बेपत्ता झाल्यास पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल होते. बेपत्ता होणारे सज्ञान असल्याने असा तपास पोलिसांकडून फारसा गांभीर्याने घेतल्या जात नाही. मात्र याउलट १८ वर्षाखालील मुली किंवा मुले बेपत्ता झाल्यास मात्र अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलीस तातडीने तपासाला सुरुवात करतात. घरच्यांचा लग्नाला विरोध असणे, घरचे जबरदस्ती लग्न लावून देत असणे, घरातील कौटुंबिक कटकटी यामुळे अनेक मुली घर सोडून निघून जातात. बहुतांश प्रकरणे प्रेम प्रकरणाशी संबंधित असतात.. विशेष म्हणजे बेपत्ता होणाऱ्यांमध्ये विवाहित तरुणींचे देखील प्रमाण वाढत आहे.
नमिता नरेश जाधव ही तरुणी पिंपळगाव राजा येथून बेपत्ता झाली. कल्पना श्रीकृष्ण गवर ही तरुणी मलकापूर तालुक्यातील बेलाड येथून बेपत्ता झाली. सौ. मंगल ज्ञानेश्वर नवले ही विवाहिता मेहकर येथून, उषा सुनील सौदागर (पिंपळगाव उंडा),सौ. गोकुळा वसंता पिसे (इंदिरानगर शेगाव), राणी किशोर दुतोंडे (बुलडाणा), विशाखा गजानन केने(समर्थ नगर मलकापूर), प्रीती संजय कावरखे ( साखरखेडा) या तरुणी गेल्या दहा दिवसांमध्ये बेपत्ता झाल्या आहेत...