निवडणूक संपली पण काम नाही थांबल! संदीप शेळके शेतकऱ्यांच्या बांधावर! रुईखेड येथे पेरणी महोत्सवाचा शुभारंभ; राजर्षी शाहू मल्टिस्टेट आणि वन बुलढाणा मिशनचा उपक्रम

 
बुलढाणा( बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : राजर्षी शाहू मल्टिस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी आणि वन बुलडाणा मिशनअंतर्गत १ जून रोजी रुईखेड टेकाळे येथे चवथ्या पेरणी महोत्सवाचा शुभारंभ झाला. यामाध्यमातून शेतकऱ्यांना थेट बांधावर खत पुरवठा करण्यात येणार आहे.
शेतकरी बांधवांच्या हस्ते पेरणी महोत्सवाचे उदघाटन झाले. यावेळी राजर्षी शाहू मल्टिस्टेटचे संस्थापक तथा वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके उपस्थित होते. गत चार वर्षांपासून शेतकऱ्यांना रास्त दरात थेट बांधावर खत वाटप करण्यात येत आहे. वेळेवर व रास्त दरात खत पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त करण्यात आला. 
दरवर्षी खतांचा तुटवडा जाणवतो. ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांची धावपळ होते. आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. अनेक संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. शेतकरी सुखी झाला पाहिजे. त्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आली पाहिजे यासाठी राजर्षी शाहू मल्टिस्टेट आणि वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येतात. भविष्यातही आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहू, अशी ग्वाही संदीप शेळके यांनी दिली. यावेळी रामकृष्ण उबरहंडे, लक्ष्मण उबरहंडे, अर्जुन जाधव, बबनराव टेकाळे, प्रल्हाद टेकाळे, गजानन टेकाळे, विष्णू टेकाळे, गजानन उबरहंडे, भागवत टेकाळे, गोविंदराव देशमुख, विजय खांबायतकर, गोटू टेकाळे, विकास टेकाळे, सुनील टेकाळे, श्याम सावळे यांची उपस्थिती होती.