बुलढाण्यातील निवडणूक 'त्या' वादळी लढतीच्या वळणावर;  रविकांत तुपकरांच्या रूपाने पुन्हा  पुन्हा एक फाटका माणूस मैदानात

 
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक सन १९८९ च्या वादळी निवडणुकीची नाट्यमय पुनरावृत्ती ठरत आहे. ही निवडणूक त्या लढतीच्या वळणावर गेली असून कोट्यधिश बलाढ्य, प्रस्थापित नेते विरुद्ध रस्त्यावरचा, चळवळीतील फाटका कार्यकर्ता अशी लक्षवेधी लढाई ठरली आहे. यामुळे यंदाचा निकाल वादळी लागण्याची चिन्हे असून  सध्या असलेली 'शांतता' ही ४ जून रोजी घोंगवणाऱ्या राजकीय वादळापूर्वीची आहे.

  यंदा  बुलढाण्यात २१ उमेदवार असले तरी, मुख्य लढत सलग तीनदा खासदार झालेले प्रतापराव जाधव व अपक्ष उमेदवार शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यात आहे. १५ वर्षांपासून खासदार असलेले जाधव यांच्या विरुद्ध अँटिइन्कबन्सी ची लाट आहे. त्यांच्या काळात झालेला शून्य विकास, भकास झालेला  मतदारसंघ, संपर्काचा अभाव पंधरा वर्षा पासून रिंगणात असलेला तोच तो चेहरा, सामान्य मतदार व जिल्हावासीयांशी कधीच न जुळलेली नाळ, निवडणूक गणिक वाढत जाणारी संपत्ती ही नाराजीची ठळक कारणे आहेत. स्वतःला भूमिपुत्र म्हणून घेणाऱ्या या नेत्याने शेतकऱ्याच्या समस्या विरुद्ध कधीच संसदेत आवाज उठविला नाही. यांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले नाही की नुकसान भरपाई, पीक विमा संदर्भात शासन दरबारी धडपड केली नाही असा आरोप आहे. यामुळे लाखो शेतकऱ्यांत खासदारांप्रती मोठा असंतोष ,खदखद ,चीड आहे. यामुळे मोठ्या संख्येतील मतदारात यांच्याबद्धल चीड आहे. असाच छुपा असंतोष मित्र पक्ष असलेली व बुलढाण्याच्या जागेवर शेवटपर्यंत दावा करणारी भाजप, दोनदा जाधवांविरुद्ध पराभूत झालेले राजेंद्र शिंगणे यांचे लाखो समर्थक यांच्यातही आहे. याउलट रस्त्यावर उतरून, शेतकरी व सामान्यासाठी लढणाऱ्या, पोलिसांचा लाठीमार खाणाऱ्या व शेकडो केसेस अंगावर घेणाऱ्या आणि गल्ली ते दिल्ली एल्गार पूकारणाऱ्या तुपकरांना लाखो शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य, युवक , सर्वधर्मीयांचा उत्साही प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या अर्ज भरण्याच्या दिवशी जमलेली गर्दी विक्रमी ठरली आहे. ठिकठिकाणच्या सभा, रॅली, कॉर्नर बैठकांना गर्दी होत आहे. लोकवर्गणी करून त्यांचा प्रचारखर्च सुरू आहे , स्वतःची वाहने आणि स्वतःची चटणी भाकर खाऊन कार्यकर्ते, सामान्य जनता प्रचार करीत आहे. त्यामुळे तुपकर नामक या फाटक्या, भणंग फकीर माणसाबद्धल यंदा  प्रचंड सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे. यामुळे यंदाची दुरंगी लढत, प्रस्थापित नेत्याविरुद्धची नाराजीची त्सुनामी विरुद्ध घरदारावर तुळशीपत्र ठेवून २२ वर्षांपासून मैदानातच असलेल्या मर्द मावळ्या युवकाबद्धल असलेली सहानुभूती, प्रेमाची लाट अशी आहे.


काय झालतं १९८९ मधी?


 नागपूरकर वासनिक परिवाराने  बुलढाण्यात राजकीय बस्तान बसविले. १९८० मध्ये बाळकृष्ण वासनिक यांनी  काँग्रेसतर्फे लढवित खासदारकी मिळविली. १९८४ मध्ये त्यांचे चिरंजीव मुकुल वासनिक यांनी बुलढाण्यातून लढवित बाजी मारली. मात्र दहा वर्षांच्या दीर्घ काळात विकास कामे झालीच नाही. या पितापुत्रांनी सर्वसामान्य जनतेशी कधीच संवाद ठेवला नाही. नेत्याच्या थाटात वागणे  , ठराविक नेत्याशीच संवाद, त्यांचीच कामे अशी त्यांची स्टाईल राहिली. यामुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा, विरोधी लाटेचा भडका १९८९ च्या लढतीत उडाला.  भाजपने मुकुल वासनिकांच्या विरोधात सुखदेव नंदाजी काळे या फाटक्या, साध्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली. ती लढत प्रस्थापित, हायफाय नेते,  मुकुल वासनिक विरुद्ध फकीर माणूस सुखदेव काळे अशी ठरली . लोकांनी काळेना डोक्यावर घेत वासनिकाना लाथाडले.बंद करा वासनिक पिता पुत्राचे चाळे, निवडून आना सुखदेव काळे असे नारा गुंजले, सत्ताधाऱ्यांच्या प्रचार वाहनावर दगडफेक, उमेदवार विरुद्ध घोषणाबाजी असा माहौल झाला. या असंतोष च्या लाटेवर स्वार होऊन काळे दिल्लीत पोहोचले. असाच राजकीय,  निवडणुकीय चमत्कार यंदा पुन्हा होण्याची दाट शक्यता आहे.