जिल्ह्याचे नवे पालकमंत्री म्हणाले जिल्ह्याचा अभ्यास केल्यावरच विकासावर बोलणार; अजितदादांच्या नाराजीचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे म्हणाले; जिल्हा सहकारी बँकेच्या सॉफ्ट लोनबद्दल म्हणाले....
जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काल ४ ऑक्टोबरला घोषणा झाल्यावर आज दिलीप वळसे पाटील बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. आधी संतनगरी शेगावात जाऊन त्यांनी गजानन महाराजांचे दर्शन घेतले. त्यांनतर बुलडाण्यात दाखल झाल्यावर त्यांनी विश्रामगृहावर माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी अजितदादांच्या नाराजीचा मुद्धा खोडून काढला.
आर्थिक अडचणीत असलेल्या बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेला ३०० कोटींचे सॉफ्ट लोन' देण्याचे आश्वासन अजितदादांनी दिले होते. त्यानंतरच आमदार शिंगणे दादासोबत आले. त्यामुळे बँकेला लोन मिळणार का आणि केंव्हा असा प्रश्न उपस्थित केला असता दादांनी शब्द दिल्याने मी त्यावर बोलणे योग्य होणार नाही. यासाठी आपण प्रयत्न करणार का? असे विचारले आमदार शिंगणे व दादामध्ये मध्यस्थी करण्याचे फारसे काम नाही. आमदार शिंगणे त्यांना थेट भेटू शकतात. यासाठी सहकार मंत्री म्हणून आपण सहकार्य करणारच अशी ग्वाही ना वळसे पाटील यांनी दिली. कार्तिकी एकादशीला कोणता उप मुख्यमंत्री विठ्ठलाची महापूजा करणार हे मुख्यमंत्री ठरवतील असे सांगून त्यांनी या प्रश्नाला बगल दिली.याशिवाय बुलडाणा जिल्ह्याचा अभ्यास केल्यानंतरच जिल्ह्याच्या विकास कामासंदर्भात बोलेल असे ते म्हणाले.