जिल्हा काँग्रेस म्हणते "है तैयार हम"! कशासाठी ते बातमीत वाचा..!

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): २८ डिसेंबरला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला १३९ वर्ष पुर्ण होत आहेत. त्या अनुषंगाने नागपुर येथे "है तय्यार हम" नावाच्या रॅली चे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष राहूल बोंद्रे यांनी दिली. आज,१८ डिसेंबर रोजी दुपारी गांधी भवन येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
२८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबईत काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली. पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त तयारी व नियोजन बैठक आज बुलडाण्यात संपन्न झाली. यावेळी बुलडाणा मतदार संघाचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, खामगावचे माजी आमदार दिलीप सानंदा, यांच्यासह आदी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कमिटीचे जिल्हा अध्यक्ष राहूल बोंद्रे यांनी स्थापना दिनाची माहिती तसेच पुढील नियोजन स्पष्ट केले. नागपुर येथे होणाऱ्या है तय्यार हम रॅली ची माहिती त्यांनी दिली.