काँग्रेसच्या मोर्चाने चिखली शहर दणाणले! राहुल बोंद्रे म्हणाले, भाजपा सरकार चे धोरण, शेतकऱ्यांचे मरण, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करून थकित पीक विम्याचे पैसे देण्याची मागणी!
तहसील कार्यालयाला घातला घेराव...
Jul 26, 2024, 20:46 IST
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात आज,२६ जुलैला चिखलीत तहसील कार्यालयात मोर्चा निघाला.शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, थकीत पीक विम्याची रक्कम देण्यात यावी यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयाला घेराव घातला. भाजप सरकारचे धोरण म्हणजे शेतकऱ्यांचे मरण आहे असा घणाघात यावेळी राहुल बोंद्रे यांनी केला.यावेळी तालुकाध्यक्ष समाधान सुपेकर,शहराध्यक्ष अतहरोद्दिन काझी,शहर कार्यध्यक्ष निलेश अंजनकर,माजी उपनगराध्यक्ष कुणाल बोंद्रे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
यावेळी जयस्तंभ चौकातील जनसेवा कार्यालय येथून बाजार गल्ली नगर परिषद मार्गे डफडे वाजवत, झेंडे,मागण्या फलक, हातात घेत कॉंग्रेस आंदोलक चिखली तहसील वर धडकले या प्रसंगी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. यावेळी बोलताना राहुल बोंद्रे पुढे म्हणाले शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे, शेतकऱ्यांना हक्काचा पीकविमा मिळालाच पाहिजे,शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांपासून संरक्षण मिळालेच पाहिजेत या व इतर घोषणांनी परिसर दनाणून सोडला होता.
Advt.👆
तहसीलदार चिखली यांना चिखली तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे या व इतर मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले.अत्यंत जीवघेण्या परिस्थितीत जीवन जगत असलेल्या बळीराजाला आधार देणे सरकारचे कर्तव्यच आहे. परिस्थितीने पिचलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. मागील ६ महिन्यात राज्यात १७२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, हे महाराष्ट्राला भूषणावह नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्याला अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतमालाला भाव नाही, शेतीला लागणारे बि-बियाणे, खते व कृषी साहित्य इत्यादी मध्ये प्रचंड महागाई झालेली आहे असे राहुल बोंद्रे यावेळी म्हणाले.
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या
नैसर्गिक आपत्ती मुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी देण्यात यावी, शेतकऱ्यांना थकीत पिक विमा तात्काळ मिळावा यासाठी जिल्ह्यातील १०४२८०१ एवढ्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती, मात्र ७७१५६ शेतकऱ्यांना ५१.३२ कोटी रु वाटप करण्यात आले पैकी उर्वरित शेतकऱ्यांना पीकविम्याची २२१.२६ कोटी रु नुकसान भरपाई मिळणे बाकी आहे.
म्हणजेज २२४९९२ शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहले आहे, खत बियाणे अन मशागतीसाठी लागणारे यंत्र साहित्य बाजार भावात नियमित वाढ होत आहे या तुलनेत शेतकऱ्यांच्या उत्पादित शेत मालाला रास्त भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे त्यातच दिवसेंदिवस महागाई ने उच्चांक गाठला असून महाविज वितरण कडून झालेली वीज दरवाढ शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारीच असल्याचे प्रतिपादनही राहुल बोंद्रे यांनी केले.